पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? जिथे अवघे 40 मिनिटेंच होतो सूर्यास्त

प्रवास हा माणसाला प्रगल्भ बनवतो. त्यामुळे प्रवास करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी पृथ्वीवरचा शेवटचा देश कोणता? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 29, 2024, 01:49 PM IST
पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? जिथे अवघे 40 मिनिटेंच होतो सूर्यास्त title=

पृथ्वी गोल आहे, अशा गोलाकार पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? त्या देशाचं वेगळेपणं काय हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक देश सुंदर असतो. आणि जर हा देश पृथ्वीच्या शेवटचा देश असेल तर त्याचं सौंदर्य अधिकच खास असेल. नॉर्वे हा जगातील सर्वात शेवटचा दिवस आहे. असं म्हटलं जातं की, हा देश पृथ्वीचा शेवट आहे. हे देशातील उत्तर पोलमध्ये आहे. नॉर्थ पोलची अशी जागा आहे जेथे पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. जाणून घ्या कसा आहे नॉर्वेचा परिसर. 

छोटी असते रात्र 

नॉर्वे हा देश सर्वात सुंदर आहे. पण तुम्हाला वाचून अजब वाटेल की, येथे रात्र होत नाही. झालीच तरी ती फार छोटी असते. नॉर्थ नॉर्वेच्या हेवरफेस्ट सिटीमध्ये फक्त 40 मिनिटांसाठी सूर्यास्त होतो. यामुळे याला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' असं देखील म्हटलं जातं. 

उन्हाळ्यात जमा होतो बर्फ 

हा देश खूप थंड आहे. अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात 45 ते 50 डिग्री तापमान असते. तेथे या देशात अक्षरशः बर्फ जमा होतो. यावेळी नॉर्वेमधील तापमान हे शून्य डिग्री असते. थंडीत हे तापमान उणे 45 डिग्री असते. येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला एका वेगळ्याच जगाचा अनुभव येतो. 

उन्हाळ्यात रात्रच होत नाही 

उत्तर ध्रुव जवळ असल्यामुळे येथे इतर देशांप्रमाणे रात्र किंवा सकाळ होत नाही. येथे सहा महिने रात्र तर सहा महिने दिवस असतो. थंडीच्या दिवसांमध्ये तर येथे सूर्य दिसणे ही कठीण होते. येथे कधी सूर्य मावळतच नाही. उन्हाळ्यात येथे रात्र होत नाही. ही जागा इतरी इंटरेस्टिंग आहे की, लोकं दूरून पाहायला येतात. 

एकटं जाण्यास मनाई 

हे सर्व जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच नॉर्वेला जावंसं वाटेल. पण E-69 हायवे पृथ्वीच्या टोकाला नॉर्वेशी जोडतो. हा रस्ता अशा ठिकाणी संपतो जिथून तुम्हाला पुढे जाताना दिसणार नाही, कारण जग इथेच संपते. या महामार्गावर जायचे असले तरी एकट्याने जाण्यास मनाई आहे. यासाठी तुम्हाला एक ग्रुप तयार करावा लागेल आणि नंतर येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. या रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला एकट्याने जाण्यास किंवा एकट्याने वाहन चालविण्यास परवानगी नाही. येथे सर्वत्र बर्फ आहे, त्यामुळे एकट्याने प्रवास करताना हरवण्याची भीती आहे.

अतिशय सुंदर आहे पोलर लाइट 

या ठिकाणी सूर्यास्त आणि पोलार लाइट्स पाहणे खूप मजेदार आहे. वर्षापूर्वी येथे मासळीचा व्यापार होत असे, पण हळूहळू या देशाचा विकास झाला आणि पर्यटक येथे येऊ लागले. आता पर्यटकांना येथे राहण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचीही सोय करण्यात आली आहे.