Anupam Kher Fake 500 Rupees Note : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत 500 च्या नोटा असून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो त्यावर दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या नोटांवर महात्मा गांधींच्या फोटो ऐवजी अनुपम खेर यांचा फोटो पाहून अभिनेत्यानं स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओला स्वत: अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे.
अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अहमदाबाद पोलिसांनी दावा केल्याचे सांगण्यात येत आहे की त्यांनी जवळपास 1 कोटी 60 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. या नोटांचा आकार, रंग आणि डिझाइन अगदी खऱ्या नोटांप्रमाणे आहे, पण या नोटांवर महात्मा गांधी यांच्या जागी अनुपम खेरचे फोटो पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर अनुपम खेर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुद्यावर त्यांची प्रतिक्रिया देत मजेशीर कमेंट देखील केली आहे.
त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटले की अशा प्रकारच्या मस्करीतून वाचून राहण्यासाठी आणि खऱ्या आणि खोट्यामध्ये काय फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी या व्हिडीओला शेअर करत कॅप्शन दिलं की 'लो जी कर लो बात! पाँच सौ के नोट पर गांधी जी की फोटो की जगह मेरी फोटो???? कुछ भी हो सकता है!'. त्यासोबत इतर नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. कोणी लिहिलं की फक्त 19-20 चा फरक आहे. दुसऱ्यानं कमेंट केली की सर खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की हसू की जो व्यापारी आहे त्याच्यासाठी रडू हेच कळत नाही आहे.
हेही वाचा : रुममध्ये Group S*X करत होते दिग्दर्शक! अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, 'मला जबरदस्ती...'
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला पाहिल्यानंतर नोट अगदी तशीच दिसत होती. त्या नोटेची डिझाइनपासून रंग आणि आकारापर्यंत सगळ्या गोष्टी या खऱ्या दिसत होत्या, पण नोटेवर महात्मा गांधीच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो दिसत आहे. त्याशिवाय नोटेवर 'रिजर्व बॅंक ऑफ इंडिया'च्या जाग 'रिसोल बॅंक ऑफ इंडिया' लिहिलेलं आहे. त्यासोबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की अहमदाबाद पोलिसांनी अशा अनेक नोटांचे बंडल जवळपास 1 कोटी 60 लाख रुपये जप्त केले आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या नोट बनवण्याच्या अनेक गॅंगचा पर्दाफाश केला आहे.