Fact Check: आलिया आणि रणबीरनं 6 नोव्हेंबर रोजी आपल्या (Alia bhatt Breastfeeding viral photo) लाडक्या लेकीचं स्वागत केलं. आलिया आणि रणबीरनं (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) त्यांच्या मुलीचं नावं राहा असं ठेवलं आहे. आपल्या लाडक्या मुलीचं नाव राहा (Raha Kapoor) ठेवल्यानंतर मीडियालाही आपली पहिली प्रतिक्रिया आलियानं सांगितली होती. हे नावं सगळ्यात सुंदर आहे अशी प्रतिक्रियानं तिनं दिलं होती. आलियाची प्रसूती झाल्यानंतर ती, रणबीर आणि तिची नवजात मुलगी राहा कपूर गाडीतून घरी रवाना झाले होते. तेव्हा त्यांचे गाडीच्या आतले फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आलियाची डिलिव्हरी झाल्यानंतर तिला दोन - तीन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला होता. परंतु त्याच्याआधी आलिया भट्ट आपल्या नवजात बाळाला आंजारताना आणि गोंजारताना दिसत होती. परंतु हे फोटो खोटे असल्याचे समोर आले होते. (fact check alia bhatt breastfeeding photo goes viral truth comes out)
त्यातून आता एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगवली आहे. सध्या या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये असं दिसतं आहे की आलिया लाल साडीत आहे. तिनं दागिने परिधान केले आहेत आणि ती तिच्या बाळाला कडेवर घेऊन स्तनपान करताना दिसते आहे. सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये. आम्ही तुम्हाला सांगतो की या फोटोमागे नक्की दडलंय तरी काय?
आलियानं तिच्या लहान मुलीचा फोटो आत्तापर्यंत तरी तिच्या चाहत्यांना दाखवलेला नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना अजूनही उत्सुक लागून राहिली आहे की आलिया आपल्या लहान मुलीचा चेहरा तिच्या प्रेक्षकांना कधी दाखवतेय याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. आलियाच्या चेहऱ्यानं व्हायरल होणारा हा फोटो खूपच क्यूट आहे पण हा फोटा आलियाचा नाही हे लक्षात घ्या कारण तो फेक आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तुम्ही तिच्या अकांऊटवर पाहाल तर आलियाने सोशल मीडियावर ब्रेस्टफिडींग करतानाचा कोणताही फोटो पोस्ट केलेला नाही. गुगल लेन्स (google lens) या फोटोमागचा खरा व्हायरल फोटो शोधला आहे. हा मूळ फोटो एका दुसऱ्या कुठल्यातरी महिलेचा आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की या फोटोमध्ये आलियाचं आहे. परंतु तिच्या डोहाळे जेवणातला एक तिचा फोटो एडिट करून दुसऱ्या एका महिलेचा ब्रेस्ट फिड करताना फोटो त्याला जोडला आहे. यामुळे लोकांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुळ फोटो गुगल इमेज सर्चद्वारे babycentre.in या वेबसाईटवर सापडला आहे. या पुराव्यावरून आलियाच्या चेहऱ्याने व्हायरल झालेला फोटो बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (alia bhatt wedding) याच वर्षी 14 एप्रिल 2022 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या अफेअरची सगळीकडेच चर्चा होती. यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच 27 जून 2022 रोजी या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट गुड न्यूज दिली. रणबीर-आलिया आई-बाबा होणार असल्याची या बातमी सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. सर्वांनीच यावर आश्चर्य व्यक्त केले होते. यामुळे अनेक चर्चांनाही उधाण आले होते. काहींनी अशी टीका केली होती. आलिया लग्नाच्या आधीच प्रेग्नंन्ट झाली आहे तर काहींना त्या दोघांच्या बाजूनं कमेंट केली होती की लग्नानंतर लगेचच मुलाचा विचार करणं यात काहीही गैर नाही.
या दरम्यान रणबीरचा शमशेरा हा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. त्यावेळी मुलाखतीच्या वेळी रणबीरनं स्पष्टीकरण दिले होते. त्यावर तो म्हणाला होता की, माझं वय आत्ता 40 आहे आणि उद्या माझा अपत्य 20 वर्षांचे झाले की मी 60 वर्षांचा होणार आहे त्यानंतर माझं वय वाढणं काही थांबणार नाही. त्यामुळे बाळाचा आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतल्याचे तो म्हणाला होता.