एक्स लव्हर्स अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी अनेक वर्षांनी आमनेसामने

ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. काही अभिनेत्रींसोबत तर अक्षय सिरीअस रिलेशनशिपमध्ये होता. त्या अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टीचही नाव आहे.

Updated: Sep 14, 2017, 05:56 PM IST
एक्स लव्हर्स अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी अनेक वर्षांनी आमनेसामने  title=

मुंबई : ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. काही अभिनेत्रींसोबत तर अक्षय सिरीअस रिलेशनशिपमध्ये होता. त्या अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टीचही नाव आहे.

अक्षय आणि शिल्पाने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे लग्नही करणार होते. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर अक्षयने ट्विंकलसोबत लग्न केले. 

१७ वर्षांआधी अक्षय आणि शिल्पा शेवटचे ‘धडकन’ या सिनेमात एकत्र दिसले होते. ब्रेकअपनंतर दोघेही ऎकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, नंतर हळूहळू सगळं निट झालं. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी दोघे एकत्र चर्चेत आले आहेत. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी आमनेसामने येणार आहेत. 

अक्षय कुमार साधारण ३ वर्षांनी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये परत येत आहे. तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोसाठी सुपर जज म्हणूण दिसणार आहे. तर दुसरीकडे शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर २’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणूण दिसणार आहे. यात महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही शो एकाच वेळी ऑन एअर जाणार आहेत. दोन्ही शो ३० सप्टेंबरला रात्री ८ वाजता वेगवेगळ्या चॅनलवर दिसणार आहे. दोन्हीही शो शनिवारी आणि रविवारी बघायला मिळणार आहेत. आता हे बघणे महत्वाचे ठरणार आहे की, प्रेक्षकांची पसंती कुणाला मिळते.