...म्हणून भडकला नेहा कक्करचा Ex Boyfriend हिमांश कोहली

 नेहाची माफी मागताना... 

Updated: Nov 11, 2020, 08:41 AM IST
...म्हणून भडकला नेहा कक्करचा Ex Boyfriend हिमांश कोहली  title=

मुंबई : लोकप्रिय गायिका नेहा कक्कर Neha Kakkar ही काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. रोहनप्रीत सिंग याच्यासह नेहानं तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. ज्यानंतर आता ही गायिका नव्यानं चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली याच्यामुळे. 

मंगळवारी हिमांशनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहाची माफी मागतानाच्या एका चुकीच्या व्हिडिओवर संताप व्यक्त केला. 

व्हिडिओतील व्हायरल होणारा स्क्रीनशॉट पोस्ट करत हिमांशनं आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. 'मी हाच विचार करतोय की या अशा गोष्टींना सोशल मीडियावर केव्हा बंदी येणार? बरं आणि याचा कोणाला फायदा होतो? यातही वाईट बाब ही, की अनेकजण हे मोठ्या उत्साहात शेअरही करतात. कृपया जागे व्हा! द्वेषभावना आणि ही खोटी पोस्ट पसरवणं थांबवा', असं त्यानं लिहिलं. 

 

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी अनपेक्षितपणे वेगळी झाली. चाहत्यांसाठी हा धक्काच होता. जवळपास दोन वर्षांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आला. ज्यानंतर त्या दोघांनीही आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या. किंबहुना नेहाच्या आयुष्यात आलेल्या या आनंदाच्या वळणाबाबत हिमांशनं मित्राच्या नात्यानं तिला काही दिवसांपूर्वीतच एका मुलाखतीत बोलताना शुभेच्छाही दिल्या होत्या. पण, सोशल मीडियावरही या व्हायरल पोस्टनं मात्र त्याचा संताप अनावर झाला.