रेखा सिनेमात काम न करताही कशी वर्षाभरात कमवते करोडों रूपये?

बॉलिवूड अभिनेत्री रेखा कोणत्याही इव्हेंटमध्ये दिसली की, तिच्याकडे महागड्या गाड्या, महागडे दागिने आणि महागड्या साड्यांमध्ये दिसते.

Updated: Feb 6, 2018, 05:10 PM IST
रेखा सिनेमात काम न करताही कशी वर्षाभरात कमवते करोडों रूपये? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रेखा कोणत्याही इव्हेंटमध्ये दिसली की, तिच्याकडे महागड्या गाड्या, महागडे दागिने आणि महागड्या साड्यांमध्ये दिसते.

तशी गेल्या काही वर्षांपासून ती सिनेमातही काम करत नाहीये. मग अनेकांना प्रश्न पडतो की, रेखा सिनेमात किंवा मालिकांमध्ये काम करत नाही तर मग तिच्याकडे इतका पैसा कुठून येतो? किंवा ती इतकं हाय प्रोफाईल जीवन कसं जगते? 

रेखाकडे किती आहे प्रॉपर्टी?

रेखाचं सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉपर्टीची किंमत जोडली तर networthtomb.com नुसार, रेखाकडे नेटवर्थ ४० मिलियन डॉलर म्हणजेच २५ अरब रूपये आहेत. रेखाच्या कमाईचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, रेखाने १९८०-८१ मध्ये ४.२५ लाख रूपये इन्कम टॅक्स भरला होता. तर याच वर्षात अमिताभ बच्चन यांनी ४.१६ लाख आयकर भरला होता. 

सॅलरी आणि रेंट

रेखा या राज्यसभा सदस्य आहेत. त्यांना वार्षिक पगार आणि भत्ते म्हणून ६५ लाख रूपये मिळतत. रेखाच्या नावावर मुंबई आणि दक्षिण भारतात अनेक प्रॉपर्टी आहेत. या प्रॉपर्टी रेखाने रेंटवर दिल्या आहेत. बांद्राच्या बॅंडस्टॅंड परिसरातील ज्या बंगल्यात रेखा रहाते त्या बंगल्या किंमत करोडों रूपये आहे. 

सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट

पत्रकार सौम्यदिप्त बॅनर्जीला दिलेल्या एका मुलाखतीत रेखाने सांगितलं की, ती पैसे खूप विचार करून खर्च करते आणि जास्तीत जास्त पैसे वाचवण्यावर भर देते. त्यामुळे ८० च्या दशकात रेखाने इतकं सेव्हिंग केलं की, आता त्यावर व्याजच लाखोंमध्ये मिळतं. 

जाहीराती

रेखा भलेही आज जाहीरातींमध्ये काम करत नसेल तरी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर बनून, इव्हेंट्समध्ये आणि स्टोरच्या ओपनिंगमधून चांगली कमाई करत आहे.