दिवसागणिक वाढतोय Esha Gupta चा बोल्डनेस, आता पोस्ट फोटोंमध्ये तर...

स्पेनमध्ये ईशाने ओलांडल्या सर्व मर्यादा, आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये दिसतोय बोल्डनेस  

Updated: Aug 31, 2022, 11:47 AM IST
दिवसागणिक वाढतोय Esha Gupta चा बोल्डनेस, आता पोस्ट फोटोंमध्ये तर...  title=

मुंबई : हिंदी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) 'आश्रम 3' सीरिजमुळे तुफान चर्चेत आली. 'आश्रम 3' सीरिजमध्ये ईशाने साकारलेली सोनियाची भूमिका प्रेक्षकांच्या तुफान पसंतीस पडली. एवढंच नाही तर, ईशा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चांगलीच चर्चेत असते. आता देखील ईशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहत्यांना ईशाचा फिट अंदाज पाहायला मिळेल.  ईशा गुप्ता ही बी-टाऊनमधील सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

ईशाचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. अशात ईशा गुप्ता अशी कोणतीही संधी सोडत नाही, ज्यामुळे तिचं नाव हॉटनेसच्या बाबतीत पुढे राहणार नाही. नुकताच ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या ईशा गुप्ता स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे आणि इंस्टाग्रामवर तिच्या आनंदाच्या क्षणांची झलक दाखवत आहे. मंगळवारी संध्याकाळी, अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्पेनमध्ये घालवलेल्या एका सुंदर दिवसातील काही सुंदर फोटो पोस्ट केले. इंटरनेटवर तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली.

सध्या सोशल मीडियावर ईशा फिटनेस व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ फार आवडत आहे. 'आश्रम 3' पूर्वी ईशाने 'जन्नत 2 ', 'बादशाहों', 'राज 3',  आणि 'कमांडो और रुस्तम' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.