धक्कादायक! ईशा देओलचा घटस्फोट? 11 वर्षांच्या वैवाहिक नात्यातलं सत्य अखेर समोर

Esha Deol Bharat Takhtan Divorce: अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे.

Updated: Jan 17, 2024, 03:14 PM IST
धक्कादायक!  ईशा देओलचा घटस्फोट? 11 वर्षांच्या वैवाहिक नात्यातलं सत्य अखेर समोर title=

Esha Deol Bharat Takhtan Divorce: अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. तिच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. ईशा आणि भरत यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकं कपल म्हणून पाहिलं जात होतं. अनेकदा हे दोघंही इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे. अनेकदा दोघंही एकमेकांसोबत फोटो शेअर करायचे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून असं होताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीत हे कपल वेगळं झाल्याचा अंदाज युजर्स  लावत आहेत.

वेगळे झाले ईशा भरत?
सध्या बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये या दोघांच्या विभक्त होण्याबाबत बरीच गॉसिप सुरू आहे आणि याची सुरुवात Reddit वर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे झाली. मिया आणि त्याची पत्नी यांच्यात काही  ठीक चालत नाही, असंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं. एवढंच नव्हेतर नुकत्याच पार पडलेल्या आमिर खानची लेक आयराच्या रिसेप्शनलादेखील ईशाने तिची आई हेमा मालिनीसोबत हजेरी लावली होती. 

नेहमीच पती भरत तख्तानीसोबत कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावणारी ईशा यावेळी हेमा मालिनी आणि तिच्या दोन मुलींसोबत दिसली.  याचबरोबर सध्या ईशा प्रत्येक कार्यक्रमांना एकटीच हजेरी लावताना दिसते.  एवढंच नव्हेतर हेमा मालिनी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही भरतने हजेरी लावली नव्हती. या सगळ्या चर्चा दरम्यान या दोघांच्या नात्यात काहीच ठइक चालत नसल्याचं बोललं जात आहे. 

काय आहे या बातमीमागचं सत्य?
आता या कपलच्या संबधित त्यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपलच्या सुरु असलेल्या घटस्फोटाच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. अभिनेत्रीने त्यांच्या लग्नाच्या ११  वाढदिवसानिमित्त तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक मोनोक्रोम फोटोही शेअर केला होता. जून मध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच लग्न  2012 साली झालं. यावेळी या लग्न सोहळ्यात देओल परिवार उपस्थित होता. या दोघांनी दोन गोंडस मुली आहेत. ज्यांचं नाव राध्या आणि मिराया आहे.