Kiara Sidharth च्या लग्नाचं रिसेप्शनचं कार्ड व्हायरल, तारीख आणि ठिकाणही ठरलं

Kiara Sidharth Reception Date: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा राजस्थानमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता मुंबईत भव्य रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे

Updated: Feb 10, 2023, 10:33 PM IST
Kiara Sidharth च्या लग्नाचं रिसेप्शनचं कार्ड व्हायरल, तारीख आणि ठिकाणही ठरलं title=

Kiara Advani and Sidharth Malhotra Reception: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara-Sidharth Wedding) यांचा राजस्थानमधल्या (Rajasthan) सूर्यगड फोर्टवर शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्य थेट दिल्लीला पोहोचले. सासरी कियाराचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर कियारा-सिद्धार्थच्या लग्नाचं रिसेप्शन (Reception) आयोजित करण्यात आलं आहे. याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. पण सोशल मीडियावर रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका (Reception invitation card) व्हायरल झालं आहे. यानुसार मुंबईत (Mumbai) भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

निमंत्रण पत्रिका पाठवल्या
राजस्थानमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याला कियारा आणि सिद्धार्थ यांचं कुटुंब आणि अगदी जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. बॉलिवूडमधून करण जोहर, मनीष मल्होत्रा, मलायका अरोरा, शाहित कपूर, मीरा राजपूत हे उपस्थित होते. पण आता लग्नाच्या रिसेप्शनला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी आतापर्यंत ज्या कलाकार, डायरेक्ट. प्रोड्यूसर यांच्याबरोबर काम केलं आहे त्यांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना आधीच निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. दीपिका-रणवीर यांच्या रिसेप्शनसारखंच सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचं रिसेप्शनही भव्यदिव्य असणार आहे. 

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन
व्हायरल होणाऱ्या रिसेप्शन कार्डनुसार सिद्धार्थ-कियाराचं रिसेप्शन 12 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. यासाठी मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल रेजिस (Hotel Regis Mumbai) बूक करण्यात आलं आहे. हॉटेल रेजिस या महागड्या हॉटेलची निवडही सिद्धार्थ-कियारानेच केली आहे. दिल्लीत झालेलं छोटेखानी रिसेप्शन हे केवळ नातेवाईकांसाठी आहे. यात बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. आता मुंबईत केवळ बी टाऊन सेलिब्रेटींना निमंत्रित करण्यात आलं आहे. 

लग्नाचा व्हिडिओ समोर
दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडिओही समोर आला आहे. कियाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. लग्नात कियाराने नाचत एन्ट्री केली आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कियारानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.