अमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे?

Amitabh Bachchan Birthday Special:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. 81 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही तरुण पिढीसाठी आयकॉन आहेत. आजही या वयातही अमिताभ बच्चन यांचं शुटिंगमध्ये बिढी असतात. 

राजीव कासले | Updated: Oct 11, 2023, 04:09 PM IST
अमिताभ बच्चन यांच्याकडे 35 कोटींचे दागिने, पाहा बँक बॅलेन्स किती आहे? title=

Amitabh Bachchan Birthday Special: बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवले असा त्यांचा फिटनेस आहे. विशेष म्हणजे 80 वर्षानंतरही त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्यांचं शुटिंगचं वेळापत्रकही व्यस्त असतं. गेल्या चार दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. अमिताभ बच्चन यांना दागिन्यांची (Jwellery) प्रचंड आवड आहे. याचं उदाहरण म्हणजे त्यांच्याकडे तब्बल 35 कोटी रुपयांचे दागिने आहेत. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांचाही सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा छंद आहे. त्यांच्याकडे करोडो रुपयांचे दागिने आहेत.

अमिताभ यांना सोन्याची आवड
अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या राज्यसभेच्या खासदार आहेत. खासदारांना आपली आणि आपल्या जीवनसाथीच्या संपत्तीची माहिती द्यावी लागते. यावरुन बच्चन कुटुंबियांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. 

अमिताभ बच्चन यांच्याकडे 2 कोटी रुपयांचं सोनं आणि 5 कोटी रुपयांची चांदी आहे. याशिवाय 28 कोटी रुपयांचे दागिने आहेत. असे एकूण मिळून त्यांच्याकडे 35 कोटी रुपयांचे दागिने आहेत. जया बच्चन यांच्याकडे 2 कोटी रुपयांचं सोनं, 89 लाख रुपयांची चांदी, 70 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा आणि 22 कोटी रुपयांचे दागिने आहेत. 

अमिताभ बच्चन यांचा बँक बॅलेन्स
दागिन्यांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांचा बँक बॅलेन्सही (Net Worth) तगडा आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबई आणि फ्रान्सच्या वेगवेगळ्या बँकेत तब्बल 47,75,95,333 रुपयांचा बँक बॅलेन्स आहे. यातले सर्वात जास्त म्हणजे 40 कोटी रुपये मुंबईतल्या विविध बँकेत एफडी आहेत. जय बच्चन या देखील  6,84,16,412 रुपयांच्या मालकिन आहेत. 6 कोटी रुपये दुबईतल्या एचएसबीसी बँकेत जमा आहेत. 

जलसाबाहेर चाहत्यांची गर्दी
अमिताभ बच्चन आज 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या वाढदिवसाची सुरुवात त्यांनी चाहत्यांची भेट घेऊन केली. अमिताभ बच्चन यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रात्री बारा वाजता चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतल्या जलसा बंगल्याबराहेर केप कापला. त्यानंतर चाहत्यांना भेटण्यासाठी स्वत: अमिताभ बच्चन जलसा बंगल्याबाहेर आले.  अमिताभ बच्चन यांना प्रत्येक चाहत्याने आपल्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.