शाहिद कपूरचा पहिल्या चित्रपटावेळी पत्नी मीरा किती वर्षांची होती? फोटो व्हायरल

Meera Rajpur Viral Photos:सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे

राजीव कासले | Updated: Jun 2, 2023, 01:26 PM IST
शाहिद कपूरचा पहिल्या चित्रपटावेळी पत्नी मीरा किती वर्षांची होती? फोटो व्हायरल title=

Meera Rajpur Viral Photos: बॉलिवूडचा (Bollywood) हँडसम हंक शाहिद कपूर (Shahid Kapoor) हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार्सपैकी (Super Star) एक आहे. तसं पाहिलं तर शाहिदला कुटुंबातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. शाहिदचे वडिल पंकज कपूर (Pankaj Kapoor) बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार आहेत, तर शाहिदची आई नीलिमा अजीम (Neelima Azeem) बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. शाहिद कपूरने चॉकलेट बॉयच्या रुपात बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले पाय भक्कम रोवले आहेत. आपल्या अनेक चित्रपटात त्याने आव्हात्मक भूमिका साकारल्या आहेत.

मीरा राजपूतचा फोटो व्हायरल
शाहिदने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हापासूनच तो क्यूट लूकमुळे युवा वर्गाचा विशेषत: तरुणींचा फेव्हरेट बनला. सध्या शाहिद कपूरचं लग्न झालं असून दोन मुलांचा पिताही बनला आहे. शाहिदने मीरा राजूपतसोबत (Mira Rajput) लग्न केलं. विशेष म्हणजे शाहिद मीरा राजपूतपेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठा आहे. सोशल मीडियावर (Social Media) मीरा राजपूतचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असून हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

शाहिदचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मीरा राजपूत साधारणत: 12 ते 13 वर्षांची होती, हा तेव्हाचा फोटो आहे. या फोटोत मीरा खूपच गोड दिसत असून तिच्या फोटोवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वयाच्या 21 वर्षी मीराने शाहिद कपूरबरोबर विवाह केला. शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल (Perfect Couple) म्हणूनही प्रसिद्ध आहे. दोघांच्या लग्नाला आता सात वर्ष झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. मीशा आणि जेन अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. 

बॉलिवूडशी फारसा संबंध नसतानाही मीरी राजपूतचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स (Followers) आहेत. आपल्या इन्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर ती शाहिद आणि मुलांचे फोटो शेअर करत असते. शाहित जेव्हा पहिल्यांदा मीराला भेटायला तिच्या घरी गेला होता, तेव्हा त्याचा अवतार बघून मीराचे वडिल चांगलेच घाबरले होते. शाहिदने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. शाहिदने तेव्हा  केस वाढवले होते, आणि पोनीटेल ठेवली होती, तसंच शरीरावर टॅटू कोरले होते. हा लूक पाहून मीराच्या वडिलांनी लग्नाआधी केस कापण्याचा सल्ला दिला होता.

शाहिदचा पहिला चित्रपट
'इश्क विश्क' (Ishq Vishk) या चित्रपटातून शाहिदने 2003 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. या चित्रपटात अमृता राव (Amruta Rao) शाहिदची अभिनेत्री होती. ही जोडी लोकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. इश्क विश्क हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही (Box Office) चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूर रातोरात स्टार बनला. त्यानंतर शाहिदने अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movie) दिले.

शाहिद जितका यशस्वी अभिनेता आहेत तितकाच उत्तम पती असल्याचं मीरा राजपूत सांगते. मीराबरोबचे अनेक फोटो शाहिद सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच मीरा आणि शाहिदचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये दोघेही घरी डान्स करताना दिसत होते. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला होता.