मुंबई : अभिनेता सलमान खान केवळ हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्याचा सुपरस्टार नाही तर त्याची जादू छोट्या पडद्यावरही चालते.
लवकरच सलमान खान हिंदी टेलिव्हिजनवर परतणार आहे.
सलमान खानने 'बिग बॉस'ची अनेक पर्व टेलिव्हिजनवर होस्ट केली आहेत. लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड्सही रचले आहेत. आता लवकरच 'दस का दम'चेही नवे पर्व सुरू होणार आहे.
'दस का दम' या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर करण्यात आला आहे. यामध्ये किती टक्के भारतीय अॅपच्या मदतीने चॅटिंग करतात, सेटिंग करतात, टॅक्सी बोलवतात आणि खाणंही निवडतात असे प्रश्न विचारत खास अंदाजात सलमान टेलिव्हिजनवर पुन्हा एन्ट्री करणार आहे.
सलमान खानच्या या मजेशीर अंदाजामध्ये त्याने ' अगर हर चीज के लिए अॅप है तो आपके और मेरे बीच गॅप क्यु ?' असे विचारत त्याने प्रेक्षकांना सोनीचं अॅप डाऊनलोड करा आणि माझ्यासोबत खेळायला सज्ज व्हा यासाठी आमंत्रण दिलं आहे.
2008 साली 'दस का दम'च्या पहिल्या पर्वाचेही सूत्रसंचलन सलमान खानने केले होते. आता नव्या पर्वामध्ये सलमान काय करतोय ? शोचा फॉर्मॅट काय असेल याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.