मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुझ यांचा रेड हा सिनेमा वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरलाय.
पहिल्या वीकेंडला या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीये. सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ४१.२५ कमाई केलीये. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या ट्विटनुसार, पद्मावतनंतर ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा रेड दुसरा सिनेमा ठरलाय.
रेड सिनेमाने पहिल्या दिवशी १०.०४ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
. @ajaydevgn - @Ileana_Official 's #Raid takes the 2nd Biggest Opening for a #Bollywood movie in 2018 after #Padmaavat
Fri - ₹ 10.04 cr.
Sat - ₹ 13.86 cr.
Sun - ₹ 17.35 cr.
Total - ₹ 41.25 cr.
— Ramesh Bala (@rameshlaus) March 19, 2018
अजय देवगणच्या या सिनेमाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही कौतुक केलेय. या सिनेमा इलियाना अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. अजय देवगण यात लखनऊचा इनकम टॅक्स अधिकारी शरद प्रसाद पांडेच्या भूमिकेत आहे.शरदने एक व्यापारी सरकार इंद्र सिंहच्या घरावर १९८१मध्ये छापा टाकला होता. यात १ कोटी ६० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. ही रेड १८ तास सुरु होती. यात ४५ लोक केवळ नोटा मोजण्यासाठी बसले होते.