घटस्फोटाच्या चर्चेवरुन उर्मिला कोठारे म्हणतेय, ब्रेकअप झालं, त्रास होतोय.... पोस्ट व्हायरल

अभिनेत्री उर्मिलाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ब्रेकअप झालंय

Updated: Dec 12, 2022, 12:04 AM IST
घटस्फोटाच्या चर्चेवरुन उर्मिला कोठारे म्हणतेय, ब्रेकअप झालं, त्रास होतोय.... पोस्ट व्हायरल title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मानसी आणि तिच्या पतीमध्ये काही ठिक चालत नसल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. मानसी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जातंय. मानसीच्या घटस्फोटोची चर्चा संपता न संपता आता अभिनेत्री उर्मिला कोठारेने ब्रेकअपची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आता तुम्हाला ही बातमी वाचून थोडा धक्का बसेल की, उर्मिला कानिकटकरच्या सुखी संसारात आता काय नवीन वादळ आलं? पण आज आम्ही तुम्हाला उर्मिलाच्या या पोस्टबद्दल सांगणार आहोत.

अभिनेत्री उर्मिलाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला and Just Feel It.. आता कदाचित तुम्हाला लिंक लागलीच असेल. जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, होय अभिनेत्रीने ही भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे

अभिनेत्रीची ही पोस्ट तिच्या आगामी सिनेमातील गाण्याबाबतची आहे. त्यामुळे जर तुम्ही जर आमची ही बातमी वाचून चिंतेत पडला असाल. तर घाबरु नका उर्मिलाची ही पोस्ट केवळ तिच्या गाण्याचं प्रमोशन आहे. लवकरच उर्मिला कोठारेचा ऑटोग्राफ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अंकुश चौधरी देखील मुख्य भूमिकेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मात्र गेल्या काहि दिवसांपुर्वी उर्मिला आणि आदिनाथ कोठारेमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात होत. पण काहीच दिवसात ही चर्चा अफवा असल्याचं स्वत: आदिनाथने सांगितलं होतं.   या जोडीनं २०११ मध्ये सप्तपदी घेतली. अर्थातच या नातं जुळलं ते  महेश कोठारे यांच्या 'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर. या सिनेमामुळे आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी सुरु झाली. यानंतर एक दोन वर्षात दोघांचं 'शुभमंगल' पार पडलं.. या गोड जोडीला एक गोंडस मुलगी आहे. उर्मिला-आदिनाथ मुलीसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.