मुंबई : सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन संदर्भात अभिनेत्री दीपिका पदुकोणची NCBकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत दीपिकाने आपण त्या ग्रुपचे ऍडमिन असल्याचं देखील कबुल केलं. पण या चौकशीत दीपिका 'इमोश्नल ब्रेकडाऊन' झाली.
NCB च्या चौकशीत दीपिकाला ड्रग्स आणि 'त्या' चॅट संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दीपिका आणि करिश्मा प्रकाशला एकमेकींसमोर बसून ड्रग्स चॅटवर प्रश्न विचारण्यात आले. याच दरम्यान दीपिकाला रडू कोसळलं.
NCB च्या अधिकाऱ्यांना दोघींनीही एकच गोष्ट सांगितली. वीडच्या प्रश्नावर सांगितलं की, ही अतिशय साधी रोल्ड सिगरेट आहे ज्यामध्ये तंबाखू भरून ओढली जाते. आणि कोड भाषेत याला हॅश किंवा वीड म्हटलं जातं.
NCBने विचारलेल्या प्रश्नांमुळे दीपिकाने आधी खूप घाबरली. गोलगोल उत्तर देत राहिली. मात्र प्रश्नांचा ओघ सुरूच होता तेव्हा दीपिकाला अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. ड्रग्स प्रकरणावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने असे असे प्रश्न विचारले की, दीपिकाला आपलं रडणंच आवरता आलं नाही. दीपिकाने मात्र अद्याप NCB ला सत्य सांगितलं नाही. त्यामुळे आता तिचा मोबाईल जप्त केला गेला आहे.
ईडीने दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माचं २०१७ चं ड्रग्स संदर्भातील चॅट सापडल्यानंतर एनसीबीला गुन्हा दाखल करायला सांगितलं. यानंतन एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दीपिकाला एनसीबीने Narcotics Control Bureau (NCB) चौकशीला बोलावले. तिची चौकशी आज संपली. तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. तब्बल साडे पाच तासांच्या चौकशीनंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून घरी रवाना झाली. मात्र दीपिकाला पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येतेय. २०१७ चे 'ते ' व्हॉट्सअप चॅट झाले होते, अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण ऍडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचेही समोर येत आहे.