VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot

Ishita Dutta Pregnancy Photoshoot: 'दृश्यम' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अजय देवगणची ऑनस्क्रिम मुलगी इशिता दत्ता (Ishita Dutt Maternity Shoot) सहा वर्षांनंतर आई होणार आहे, सध्या तिचं फोटोशूट हे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 13, 2023, 02:11 PM IST
VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot title=

Ishita Dutta Pregnancy Photoshoot: बॉलिवूडमध्ये आता पेव फुटलंय ते म्हणजे बेबी बम्प किंव प्रेग्नंन्सी फोटोशूटचं. इन्टाग्रामवर मोठ मोठ्या अभिनेत्री आणि अभिनेते हे आता आपल्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्यामुळे इन्टाग्रामवर सध्या अशा फोटोंची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभुमीवर आता अजून एका अभिनेत्रीनं आपलं एक लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. अभिनेता अजय देवगणच्या ऑनस्क्रिन मुलीची भुमिका निभावणाऱ्या इशिता दत्तानं (Ajay Devgan Onscreen Daughter Ishita Dutta) आपलं एक हटके फोटोशूट शेअर केलं आहे. सध्या तिच्या या फोटोशूटचा व्हिडीओ हा सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोशूटला तिच्या चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

तिचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतं आहे. त्यामुळे सगळीकडेच इशिताची चर्चा आहे. इशितानं 'दृश्यम' या चित्रपटातून महत्त्वपुर्ण भुमिका निभावली आहे. पती वत्सल सेठ सोबत तिनं मॅटरनिटी शूट (Maternity Shoot) केलं आहे. यावेळी त्यांनी ट्विनिंग कपडे (Twinning Clothes) घातले आहे. गुलाबी रंगांचे ट्विनिंग कपडे त्यांनी घातले आहेत. तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून तिनं हे फोटोशूट शेअर केलं आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''या फीलिंग ला एक्सप्रेस करण्यासाठी माझ्याकडे कुठलेच शब्द नाहीत. या क्षणांना कैद करण्यासाठी @littletoesbymuskan चे खूप आभार.'' 

यावेळी तिनं आपलं बेबी बम्प फ्लॉनट् (Baby Bump_ करत थाय-हाय स्लिट गाऊन घातला होता. यावेळी त्यांनी पेस्टल शेड्सना पसंती दिली होती. तर तिचा पती वत्सल शेठ हा पेस्टल रंगाच्या (Pastal Color Outfit) पॅन्ट सूटमध्ये दिसला. त्यांच्या या फोटोशूटवर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2017 साली त्या दोघांनी लग्न केले तेव्हा त्यांना 6 वर्षांनी मूल होणार आहे. 

हेही वाचा - Bollywood चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?; तुमच्या मनातील प्रश्नाचं हे घ्या उत्तर

सध्या प्रेग्नंन्सी फोटोशूटला (Pregnancy Photoshoot) सेलिब्रेटींच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यासाठी सेलिब्रेटी हे विशेष मेहनत घेताना दिसतात. त्यांचे हे फोटोशूट महागडंही असते. त्याच्यासारखे फोटोशूट हे सामान्य प्रेक्षकही मगं करताना दिसतात. सध्या इशिताचे फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले आहे. काल अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिनं आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी शेअर केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे तिनंही आपलं एक हटके फोटोशूट शेअर केलं होतं. तिच्या फोटोशूटलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या हे फोटोशूट मोठमोठ्या फोटोग्राफर्सकडून केलं जात आहे. सोबतच यासाठी अनेक दिवसही खर्च केले जातात. सोबतच अनेकदा हे फोटोशूट केल्यावर (Celebrity Trolled For Pregnancy Photoshoot) सेलिब्रेटी ट्रोलही होतात.