मुंबई : 'ड्रीम गर्ल 2' OTT वर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला एक दिवस बाकी आहे. आयुष्मान खुरानाचा चित्रपट 20 ऑक्टोबरपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. अशाप्रकारे, जे प्रेक्षक थिएटरमध्ये या सिनेमाचा आनंद घेण्यास चुकले होते ते आता OTT वर पाहू शकतात. 'ड्रीम गर्ल 2' हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याच्या पहिल्या भागात आयुष्मान खुराना, नुसरत भरुचा, विजय राज आणि मनजोत सिंह महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
ड्रीम गर्लच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डवरही एक नजर टाकूया. ड्रीम गर्ल 2 चे बजेट जवळपास 35 कोटी रुपये होतं. तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरून तिप्पट किंमत वसूल केली आहे. अशाप्रकारे, मोठ्या प्रतीक्षेनंतर आता चाहत्यांना त्यांचा आवडता चित्रपट OTT वर पाहण्याची संधी मिळणार आहे.
आयुष्मान खुराना आणि विजय राजशिवाय अनन्या पांडे, परेश रावल आणि राजपाल यादव 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं आहे. अशाप्रकारे ड्रीम गर्लचा पहिला भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.
ड्रीम गर्ल 2 ने किती केला व्यवसाय?
ड्रीम गर्ल 2 ने बॉक्स ऑफिसवर खूप चांगला गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला तिकीट खिडकीवर चांगली ओपनिंग मिळाली होती, मात्र जवान रिलीज झाल्यानंतर ड्रीम गर्ल 2 ला घसरणीचा सामना करावा लागला. या चित्रपटाने अजूनही रु. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आणि सुमारे 104 कोटी रुपयांचे नेट लाइफटाइम कलेक्शन केलं.
चित्रपटाची स्टार कास्ट
ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात परेश रावल, विजय राज, असरानी, राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.