वडिलांसोबत असलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलत का? Taarak Mehta मालिकेत साकारते महत्त्वाची भूमिका

या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. 

Updated: Jul 31, 2022, 01:17 PM IST
वडिलांसोबत असलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलत का? Taarak Mehta मालिकेत साकारते महत्त्वाची भूमिका title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सगळ्याच वयोगटातीील लोकांना हा शो खूप आवडतो. फक्त शो नाही तर मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तुम्ही जर या शोचे चाहते असाल तर हा फोटो ओळखून दाखवा ही मुलगी मालिकेतील कोणती अभिनेत्री आहे. 

फोटोत वडिलांसोबत दिसणारी ही चिमुरडी दुसरी कोणी नसून मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये ती बबिता जीची भूमिका साकारत आहे. ती अनेक वर्षांपासून या मालिकेत असून तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. 'फादर्स डे'च्या निमित्ताने मुनमुन दत्तानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. हा फोटो अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोत मुनमुन वडिलांसोबत दिसत आहे. 2018 साली मुनमुनच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा सहकलाकार राज अनडकटला डेट करत आहे. राज तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. ही बातमी पसरताच मुनमुनला प्रचंड ट्रोल करण्यात आले, त्यामुळे ती चांगलीच संतापली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. 

मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मुनमुननं तर तिच्या डान्सच्या स्किल्सनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याचं सांगितलं. तर बराच काळ मालिकेत मुनमुन दिसली नाही म्हणून तिनं शो सोडल्याची चर्चा सुरु होती.