Diwali Party: अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच; पाहा Video

आदित्य रॉय कपूर आणि 'तिचा' एकत्र व्हिडीओ अखेर समोर... चर्चा झाल्या, थट्टामस्करी झाली,  एकमेकांच्या नावानं चिडवणंही झालं... आता अखेर ते एकत्र दिसलेच   

Updated: Oct 21, 2022, 09:44 AM IST
Diwali Party: अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच; पाहा Video title=
Diwali 2022 does annanya pandey and aditya roy kapur just confirmed their relationship watch video

Aditya Roy Kapur : सेलिब्रिटी मंडळी सहसा त्यांच्या खासगी आयुष्याला गुलदस्त्यातच ठेवतात. कोणत्याही नात्यामध्ये अमुक एका वळणावर आल्यानंतरच ते नात्याची ग्वाही देतात. गंमत म्हणजे सेलिब्रिटी जोड्या विविध पार्टी आणि कार्यक्रमांमध्येच नकळतपणे त्यांच्या खासगी आयुष्याचे संकेत देत असतात. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की (Ranbir Kapoor Alia bhatt) रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या नात्यावर अशाच एका सोहळ्यादरम्यान कबुली दिली होती. अगदी ऋतिक आणि सबा आझादही (Hritik Roshan saba azad) याला अपवाद नाहीत. यातच आता आणखी एका जोडीचं नाव जोडलं जाऊ शकतं. 

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra)  याच्या घरी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी  (Diwali Party) या जोडीनं हजेरी लावली आणि त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. मुख्य म्हणजे या पार्टीआधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा झाली. इतकंच काय, तर एकमेकांच्या नावांवरून त्यांना छेडलंही गेलं. आता अखेर हे सेलिब्रिटी कपल पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आलं. 

पाहा : Diwali 2022 : दिवाळी पार्टीसाठीनं ब्रेकअपमुळे खचलेले, प्रेमात पडलेले सर्व सेलिब्रिटी 'खास' ठिकाणी एकत्र 

हे Couple म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya roy kapur) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (annanya pandey). काहींच्या मते त्यांचा चित्रपट येत असावा म्हणून ही स्टंटबाजी. पण, प्रत्यक्षात तसं नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य आणि अनन्याच्या लग्नाच्याही चर्चा सुरु आहेत. 

आदित्य- अनन्यानंआतापर्यंत त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. उलटपक्षी आपण चांगले मित्र असल्याचंच त्यानी म्हटलं आहे. पण, मनिषच्या दिवाळी पार्टीला (Bollywood Diwali Party) एकसारख्या रंगाचे कपडे घालत ट्विनिंग करणाऱ्या या जोडीमध्ये नेमकं काय सुरुये याचा अंदाज आता सर्वांनाच आला आहे. 

अधिक वाचा : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचं हे कृत्य कॅमेरात कैद; फोटो व्हायरल

बरं, या चर्चांना आणखी वाव तेव्हा मिळाला, जेव्हा माध्यमांची गर्दी पाहून अनन्या Uncomfertable वाटली. आदित्य मात्र तिला फोटोसाठी उभं राहण्यास विनवताना दिसला. आता ही मनधरणी प्रेमाची आहे की सहजच केलेली ते येता काळच ठरवेल...