'नागाला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर...' या व्यक्तीने दिला होता समंथा रुथ प्रभूला सल्ला

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटापूर्वी साऊथ इंडस्ट्रीतील परफेक्ट कपलपैकी एक होते. कलाकारांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपट जीवनासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.  नागा आणि सामंथा त्यांच्या घटस्फोटामुळे अजूनही चर्चेत आहेत.

Updated: Nov 14, 2022, 11:18 PM IST
'नागाला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर...' या व्यक्तीने दिला होता समंथा रुथ प्रभूला सल्ला title=

मुंबई : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे त्यांच्या घटस्फोटापूर्वी साऊथ इंडस्ट्रीतील परफेक्ट कपलपैकी एक होते. कलाकारांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक समंथा रुथ प्रभू तिच्या चित्रपट जीवनासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.  नागा आणि सामंथा त्यांच्या घटस्फोटामुळे अजूनही चर्चेत आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा समंथा आणि नागा एकमेकांसोबत वैवाहिक नातेसंबंधात होते, तेव्हा एका व्यक्तीने सामंथाला तिच्याशी लग्न करण्यास आणि तिच्या पतीला म्हणजेच नागाला घटस्फोट देण्यास सांगितलं होतं. असं बोलणारी व्यक्ती सामंथाची डाय हार्ट फॅन होती.

समंथाने हे उत्तर दिलं
खरंतर ही गोष्ट २०२० सालची आहे. समांथाने तिच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या ड्रेसमध्ये स्वतःचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती खूप आनंदी दिसत होती आणि त्यावर तिने लिहिलं होतं, 'फीलिंग गुड.' समांथाच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या एका चाहत्याने तिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्या चाहत्याने लिहिलं की, "तुम्ही तुमच्या पतीला घटस्फोट देऊ शकता, आम्ही दोघे लग्न करू."

समंथानेही या चाहत्याला अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. तिने त्याला उत्तर दिलं आणि लिहिलं, "कठीण आहे, पण एक काम करा, चैतन्यलाच विचारा."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नानंतर चार वर्षांनी वेगळे झाले
मात्र, या चाहत्याने समंथाला जे सांगितले ते केवळ त्याचं अभिनेत्रीवरील प्रेम होतं. मात्र, लग्नाच्या चार वर्षानंतर नागा आणि समंथा एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं, मात्र त्यानंतर 2021 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.