दिशाचा बॅकफ्लिप वर्कआउट पाहिला का?

 बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. 

Updated: Jul 14, 2019, 01:28 PM IST
दिशाचा बॅकफ्लिप वर्कआउट पाहिला का? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून दिशाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. दिशा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने शेअर केलेला स्वत:चा वर्कआउट व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत. दिशाच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

First attempt to a self backflip, still need to make it much cleaner but atleast the fear is gone everyday makes a difference(also me being the stubborn me)

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने शेअर केलेला वर्कआउटचा व्हिडिओ फार अव्हानात्मक असल्याचे दिसत आहे. दिशा एका व्हिडिओमध्ये बॅकफ्लिप वर्कआउट करताना दिसत आहे. एक दिवसह पूर्ण झालेल्या व्हिडिओला तब्बल २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे

दिशा पटनी सध्या तिचा आगामी 'मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात मोहित सुरी आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. 'आशिकी २' चित्रपटात या दोन कलाकारांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. 'मंगल' चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि कुणाल खेमू देखील भूमिका साकारणार आहेत.