पाहा दिशा पटानीच्या इंटरनॅशनल डान्स मूव्ह्ज (व्हिडिओ)

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही वेळापुर्वी दिशाने डान्स व्हिडिओ शेअर केलाय.

Updated: Dec 1, 2018, 01:40 PM IST
पाहा दिशा पटानीच्या इंटरनॅशनल डान्स मूव्ह्ज (व्हिडिओ)  title=

नवी दिल्ली : अभिनेत्री दिशा पटानी सिनेमामुळे कमी चर्चेत असली तरीही त्यापेक्षा अधिक चर्चा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटची असते.  तिचे कोणतेही फोटोशूट, सिक्वेंसची प्रॅक्टीस असो किंवा डान्स सोशल मीडियात लगेच व्हायरल होतात. टायगर श्रॉफसोबत 'बागी 2' मध्ये दिसलेली दिशा आगामी सिनेमात सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ती डान्सिंग प्रॅक्टिस करत असते.

टायगरलाही आनंद ?



View this post on Instagram


#FEFE choreography @moonlightt_____________ @nickiminaj

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही वेळापुर्वी दिशाने डान्स व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती जबरदस्त डान्स मूव्ज करताना दिसतेय. दिशाचं नाव तिचा को-स्टार टायगर श्रॉफसोबत याआधी जोडल गेलय. ही जोडी नेहमी लंच डेट वर दिसायची.

दिशाचा हा डान्सिंग व्हिडिओ पाहून आपल्या डान्सिंग स्किलसाठी प्रसिद्ध असलेला टायगर श्रॉफ नक्कीच आनंदीत होईल. 

 भारत सिनेमामध्ये सलमान सोबत दिशा पटानी, कॅटरिना कैफ आणि तब्बू दिसणार आहेत. या सिनेमात ती एक्शन सिन्स करताना दिसणार आहे. याची प्रॅक्टीस करतानाही तिचे व्हिडिओ चर्चेत असतात.