Love Sex Aur Dhokha 2 : 'लव सेक्स और धोखा' या चित्रपटानं त्यांच्या कंटेन्टनं लोकांमध्ये असलेली उत्सुकता वाढवली आहे. त्यात कोणते कलाकार दिसणार आहेत, त्याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र, असं म्हटलं जातं की यूट्यूबर कॅरी मिनाटी त्याची रियल लाइफ स्टोरी सांगताना दिसू शकतो. आता अशी माहिती समोर आलेली आहे की दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीनं देखील कोणतीही कसर सोडलेली नाही आणि त्यासाठी त्यांनी तब्बल 6000 पेक्षा जास्त कलाकारांचं ऑडिशन घेतलं. त्याचं कारण त्यांना या चित्रपटात भूमिकेला शोभतील असे कलाकार हवे आहेत.
'लव सेक्स और धोखा 2' चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांची एक वेगळी स्पेसिफिक पद्धत निवडली आहे. जेणेकरून त्यांना भूमिकेला शोभतील असे कलाकार मिळतील. एका सोर्सनं दिलेल्या माहितीनुसार, 'दिबाकर बॅनर्जीनं योग्य कलाकार शोधण्यासाठी 6 हजार ऑडिशन्स घेतले. ऑजिशन्सच्या आधी देखील ते ज्या प्रकारच्या भूमिका लिहत होते त्याला घेऊन ते पर्टिक्युलर होते आणि ज्या पद्धतीनं त्यांनी यासाठी रिसर्च केली, ती देखील अप्रतिम आहे.'
सोर्सनं दिलेल्या माहितीनुसार, एक पटकथा जी यूट्यूबवर आधारीत आहे, त्यासाठी दिबाकर बॅनर्जी आणि एकता आर कपूरनं देशभरातील वेगवेगळ्या यूट्यूबर्सचे खूप फोटो आणि व्हिडीओ पाहिले. जवळपास 10 ते 12 तास आणि आणखी काही दिवसांसाठी. यूट्यूबर्स कसे बोलतात, त्यांच्या चाहत्यांसाठी कॉन्टेन्ट तयार करतात हे सगळं पाहिलं. त्यातून त्यांना युट्यूबर्सविषयी अनेक गोष्टी कळाल्या. त्यातून त्यांना कळलं की त्यांच्या भूमिकांमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. हेच एक कारण आहे की त्यासाठी नवीन चेहरे हवे होते. त्यात असं दाखवणार आहेत की काही इनफ्लुएन्सर जे आधी सर्वसामान्य होते आणि काही काळात त्यांची लोकप्रियता जगभरात पसरली.
हेही वाचा : बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला 'हा' अभिनेता?
दरम्यान, बालाजी टेलीफिल्म्स आणि कल्ट मूव्हीजच्या बॅनरखाली बनवण्यात येणार आहे. दिबाकर बॅनर्जी प्रोडक्शनच्या 'लव सेक्स और धोखा 2' ज्याला एकता आर कपूर आणि शोभा कपूरनं निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीनं केलं आहे. हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.