अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस

कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो. 

Updated: May 31, 2022, 12:07 PM IST
अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : पती आणि पत्नीचं नातं अनेकदा बरेच आदर्श प्रस्थापित करतं. मुळात या नात्याची सुरुवातच आदर्शांपासून होते. कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो. 

पती- पत्नीच्या नात्याची एक सुरेख बाजू नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे एका सेलिब्रिटी जोडीचं. अभिनेता सूरज थापर प्रचंड भाग्यवान आहे. खुद्द सूरजचं हेच म्हणणं. (Dipti dhyani shaved off her head for husband actor sooraj thapar as her wish completed)

विविध भूमिका साकारणाऱ्या सूरजसाठी त्याची पत्नी दिप्ती ध्यानी हिनं असं काही काम केलं आहे, की पाहणारेही हैराण झाले आहेत. बहुधा तुम्हाला माहितही नसावं, पण मागील वर्षी सूरजला कोरोनाची लागण झाली होती. त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आलं होतं. 

सूरजची अवस्था फारच वाईट होती. पतीची ही अवस्था पाहता, दिप्तीनं देवाचा धावा सुरु केला, डॉक्टरांच्या प्रयत्नांत त्यांना साथ दिली. सूरज पूर्णपणे बरा होऊन घरी परतल्यास आपण तिरुपतीच्या मंदिरात केस दान करणार असल्याचा नवस ती बोलली होती. 

सूरज आता पूर्णपणे बरा झाला आहे, परिणामी त्याची पत्नी, दिप्ती हिनं मुंडन करत आपला नवस पूर्ण केला आहे. दिप्तीनं तिला हा Bald look सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 

सूरजनंही दिप्तीच्या या ट्रान्सफॉर्मेशनवर प्रतिक्रिया देत हेच खरं प्रेम आहे, कोणीही इतकं कोणासाठी कुठे करतं... असं म्हणत तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. एका मुलाखतीमध्ये त्यानं दिप्तीच्या या नवसाचीही माहिती दिली. 

रुग्णालयातून परतल्यानंतर जेव्हा सूरजला ही गोष्ट कळली, तेव्हा तो दिप्तीच्या मुंडनाच्या निर्धारानं बेचैन झाला होता. पण, ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. पतीनं त्याच्या पायांवर पुन्हा उभं राहावं, हेच तिच्यासाठी प्राधान्यस्थानी होतं. 

दिप्तीसुद्धा एक अभिनेत्री असल्यामुळं तिच्या करिअरचीही सूरजला चिंता वाटत राहिली. ज्या क्षणी तिनं केस कापले, त्या क्षणाविषयी सांगताना सूरज म्हणाला; 'ती मंदिरात शांत बसली होती. देवाचं नाव जपत होती. हा क्षण आम्हा दोघांसाठीही भावनिक होता. पण, दिप्तीच्या महत्त्वाकांक्षी ताकदीनं सर्व थोपून नेलं. आता मात्र ती तिच्या या लूकला तितक्याच आत्मविश्वासानं सर्वांसमोर आणताना दिसते.'