दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से

South Film Stars Are Fake: एका मुलाखतीमध्ये सेलिब्रिटींची फोटो काढण्याचा या फोटोग्राफरने अनेक गोष्टींसंदर्भात खळबळजनक विधानं करत काही अभिनेत्यांच्या वागण्याकडे इशाऱ्यांमधून भाष्य केलं आहे. सध्या ही मुलाखत चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 11, 2024, 04:29 PM IST
दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से title=
सेलिब्रिटी फोटोग्राफरनं केला भांडाफोड

South Film Stars Are Fake: महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर आणि विजय देवरकोंडा यासारखे दाक्षिणात्य अभिनेते सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये दिसतात तितके साधे,सभ्य अन् माणुसकी जपणारे नाहीत असा खळबळजनक दावा बॉलिवूडमधील पापाराझी असलेल्या विरेंद्र चावलाने केला आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकांरांच्या वागण्यातील फरकामधून त्यांची तुलना केली जाते. अनेकदा दाक्षिणात्य अभिनेते हे माणुसकी दाखवण्यासंदर्भात बॉलिवूड कलाकारांपेक्षा सरस असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र विरेंद्र चावलाच्या दाव्यानुसार दाक्षिणात्य अभिनेते कॅमेरासमोर केवळ दिखावा करतात तर बॉलिवूडचे कलाकार खरोखरच कॅमेरापुढे आणि कॅमेरा नसतानाही माणुसकी दाखवतात.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांची तुलना

कोरोनाच्या लाटेनंतर आणि खास करुन अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर अनेक स्तरामधून बाहेरुन येणाऱ्यांबद्दल असलेल्या द्वेष आणि कथित अडथळ्यांवरुन बरीच टीका झाली. याच कालावधीमध्ये अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या चित्रपटांनी हिंदी पट्ट्यात बक्कळ कमाई केली. त्यानंतर या दोन्ही चित्रपटसृष्टीमधील कलकारांच्या वागण्याची तुलना सोशल मीडियावर अनेकदा होताना दिसली. दाक्षिणत्य कलाकार किती साधे आहेत, चाहत्यांची किती काळजी करतात असं दर्शवणारे अनेक व्हिडीओ वेळेवेळी व्हायरल होत असतात. त्याचबरोबर बॉलिवूडच्या कलकारांचे कथित आरेरावीपणे वागण्याचे व्हिडीओही व्हायरल होत असतात.

दाक्षिणात्य कलाकारांचा केवळ दिखावा?

मात्र पापराझी म्हणजेच सेलिब्रिटींचे फोटो काढण्याचं काम करणाऱ्या विरेंद्र चावला यांना हिंदी वृषला दिलेल्या मुलाखतीमध्ये दाक्षिणात्य कलाकारांच्या वागणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विरेंद्रने विजय देवरकोंडा हा चित्रपट प्रमोशन करण्यासाठी मुद्दाम स्लीपर घालून आल्याचा उल्लेख केला तर नुकत्याच एका कार्यक्रमात ज्यूनिअर एनटीआरचा संयम सुटल्याचा किस्साही त्याने सांगितला.

'खोटं वागतात'

"खरं सांगायचं झालं तर ते लोक नकलीपणा करतात (खोटं वागतात.) केवळ कॅमेरात दिसावं म्हणून ते तसं वागतात. कॅमेरासमोर आपण किती साधे आहोत हे दाखवण्यासाठी एक अभिनेता नुकताच स्लीपर घालून चित्रपट प्रमोशन्सच्या कार्यक्रमाला आला होता," असं विरेंद्रने सांगितलं. विरेंद्र अभिनेता विजय देवरकोंडाबद्दल बोलत होता. तो 'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्लीपर घालून आलेला.

न्यूनिअर एनटीआरला सूचक टोका

"नुकताच माझ्या टीमने दक्षिणेतील एका मोठ्या सुपर स्टारचा व्हिडीओ शूट केला. सामान्यपणे तो फार शांत असतो. तो एका हॉटेलमध्ये जात असतानाच त्याने माझ्या टीम मेंबरवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मी हे पोस्ट केलं नव्हतं पण अन्य एका फोटोग्राफरने हे पोस्ट केलं," विरेंद्रने थेट ज्यूनिअर एनटीआरचं नाव घेतलं नाही. मात्र नुकताच त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विरेंद्रचा निशाणा न्यूनिअर एनटीआरच्या दिशेनेच असल्याचं स्पष्ट होतं.

महेश बाबूवरही साधला निशाणा

महेश बाबूबद्दल बोलताना विरेंद्रने त्याला बॉलिवूड नको असतं, असं सांगितलं. बेंगळुरुमधील एका कार्यक्रमात महेश बाबू उघडपणे हे बोलल्याची आठवणही विरेंद्रने करुन दिली. "तो उघडपणे बोलत होता की आपल्याल बॉलिवूडची गरज नाही. त्यांना मी परवडणार नाही. मला तेव्हा वाटलं की ही काय भूमिका आहे? हा खोटारडेपणा वाटलं. ते बॉलिवूडशी तुलना करतात. मात्र बॉलिवूडमधील कलाकार किमान खोटारडेपणाने वागत तरी नाहीत. ते आहेत तसेच कॅमेरासमोरही वागतात. अगदी राग आला तरी ते व्यक्त होतात," असं विरेंद्र मुलाखतीच्या शेवटी म्हणाला.

महेश बाबूने बॉलिवूडला 'मी परडणार नाही' या वक्तव्यानंतर सारवा सारव करताना, 'मला फक्त तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचं आहे', असं म्हटलं होतं.