'Taarak Mehta...' फेम जेठालालच्या घरी वाजणार सनई चौघडे

जेठालाल यांच्या जवळची व्यक्ती डिसेंबर महिन्यात अडकणार विवाह बंधनात  

Updated: Dec 4, 2021, 11:23 AM IST
'Taarak Mehta...' फेम जेठालालच्या घरी वाजणार सनई चौघडे title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्स संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याबद्दल उत्सुक असतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आज एक आनंदाची बातमी शेअर करणार आहोत. मालिकेमध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या लवकरचं सनई चौघडे वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी ऐकून जेठालाल यांचे चाहते नक्की कोणाचं लग्न असा प्रश्न विचारत आहेत. 

दिलीप जोशी यांच्या मुलीचे यंदाच्या महिन्यात लग्न होणार आहे. दिलीप जोशी यांना दोन मुले आहेत. हे फार लोकांना माहीत नाही. मुलगा ऋत्विक जोशी आणि मुलगी नियती जोशी. दिलीप जोशी यांची मुलगी डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. जेठालाल यांना होणार जावई  एनआरआय आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

डिसेंबर महिन्याच्या 11 तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न होणार असल्याचं समोर येत आहे. एका वेबसाईटनुसार, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वत: दिलीप जोशी सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

इतकेच नाही तर या शुभ सोहळ्यासाठी संपूर्ण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' टीमला आमंत्रित करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. दिशा वाकाणीसह अनेक जुन्या सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण याबद्दल जेठालाल यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही.