मुंबई : टीव्हीची प्रसिद्ध जोडी देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी हे प्रत्येकाच्या आवडत्या कपलपैकी एक आहेत. या कपलने 'रामायण' या पौराणिक मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात छाप सोडली. मात्र आजकाल देबिना आणि गुरमीतचे वधू आणि वर अवतारातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे चाहते दोघांनी पुन्हा लग्न केलं आहे का असा प्रश्न विचारत आहेत.
देबिना आणि गुरमीत अनेकदा त्यांच्या बॉण्डिंगमुळे हेडलाईन्समध्ये राहतात. पण यावेळी हे कपल बंगाली परंपरेने सजलेल्या देबिना आणि गुरमीतच्या व्हायरल फोटोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. दोघंही बंगाली ड्रेसमध्ये वधू आणि वर म्हणून बसले आहेत. ही फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करतायेत, याचबरोबर युजर्स विचारत आहेत की, या कपलने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे का?
व्हायरल फोटो काय म्हणत आहेत?
या देबिनाने स्वत: हे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. ज्यात तिने 'शेवटी' कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आता याचा अर्थ काय आहे हे सांगणं थोडे कठीण आहे. दोघांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे का? सध्या याविषयी अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही.
देबीना आणि गुरमीतचं लग्न दहा वर्षांपूर्वी एका मंदिरात झालं होतं. तेव्हापासून देबिनाने पारंपारिक बंगाली लग्नाची इच्छा होती. हे फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, कदाचित या कपलने त्यांचं बंगाली रीतिरिवाजानुसार लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे..