'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले

Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 11, 2024, 04:17 PM IST
'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले title=
अमिताभ यांना पत्नीसमोरच विचारण्यात आलेला प्रश्न

Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: अमिताभ बच्चन अभिनेत्री रेखाबद्दल खोटं बोलले की काय? अशी चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये सुरु आहे. या चर्चेला कारण ठरत आहे, 'रेंडेवू विद सिमी ग्रेवाल' (Rendezvous with Simi Garewal) चा एक जुना भाग! या भागाबद्दल सिमी ग्रेवाल यांनीच भाष्य केलं असून त्या ज्या भागाबद्दल बोलत आहेत त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची मुलाखत घेतली होती. अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करत असतानाच हा भाग प्रदर्शित झालेला. 

सर्व बाजूंनी संकटात अडकलेले

अमिताभ यांची 'अमिताभ बच्चन कॉर्परेशन लिमिटेड' ('एबीसीएल') कंपनीसमोर अनेक आर्थिक व्हावं होती. अमिताभ त्यावेळे त्यांच्या करिअरमध्ये अशा ठिकाणी होते की ते बरोबर करत आहेत की चूक यावरुनही त्यांच्यावर टीका होत होती. हा सारा वाद होत असतानाच अमिताभ बच्चन यांनी थेट राष्ट्रीय वाहिनीवर येऊन थेट मुक्तपणे सिमी ग्रेवाल यांच्याबरोबर संवाद साधण्याचा निर्णय घेतला. या चर्चेदरम्यान त्यांनी अभिनेत्री रेखाबरोबरचे कथित प्रेमसंबंधांपासून ते जया बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्नांची अगदी मनमोकळेपणे उत्तरं दिली.

त्यांनी मोकळेपणे बोलावं...

याच मुलाखतीबद्दल सिमी ग्रेवाल यांनी 'रेडिफ'शी बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेस अशाप्रकारे मुलाखत देण्यास होकार देणं किती महत्त्वाचं होतं हे समजावून सांगितलं होतं. ते फार विचलित होते तरीही त्यांनी संयम कायम ठेवला आणि छान उत्तरं दिली. अमिताभ यांनी स्वत:ला सुरक्षित समजून मनमोकळेपणे बोलावं असा या मुलाखतीचा हेतू होता. या मुलाखतीमध्ये अनेक कठीण प्रश्नांना ज्या पद्धतीने अमिताभ यांनी तोंड दिलं ते कौतुकास्पद असल्याचं सिमी ग्रेवाल यांनी म्हटलं. "आम्ही जवळपास सर्व विषयांवर बोललो. त्यांचं बालपण, तारुण, पालक, एबीसीएल, आपटलेले चित्रपट, दमदार पुनरागमन, कुटुंब, जया, त्यांची मुलं, त्यांना स्रियांचे कोणते गुणधर्म आवडतात, त्यांचे प्रोफेश्नल निर्णय. यावर आम्ही बोललो," असं सिमी ग्रेवाल यांनी म्हटलं. 

नक्की पाहा हे फोटो >> कंगणाने मुंबई सोडली... BMC चा हातोडा पडलेला बंगला विकला! कोट्यवधी कमवले; विक्रीची किंमत...

अनेकजण म्हणाले अमिताभ खोटं बोलले

या मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवाल यांना अमिताभ यांनी फार प्रमाणिक स्पष्ट उत्तरं दिली असं अनेकांना वाटत होतं. मात्र स्वत: सिमी ग्रेवाल यांना याच्या अगदी उलट वाटत होतं. "मला वाटतं की त्यांनी प्रमाणिकपणे उत्तर दिली. या मुलाखतीनंतर काही लोकांनी, "अमिताभ बच्चन असा नाहीये" असंही म्हटलं. तसेच काहींनी, "त्यांनी रेखाबद्दल खरं सांगितलं नाही," असंही म्हटलं," अशी माहिती सिमी ग्रेवालने दिली.

दोन भागात झालं शूटींग

सिमी ग्रेवाल यांनी केवल अमिताभ यांच्याबरोबर एक भाग शूट केला आणि एक भाग अभिताभ आणि जया बच्चन यांच्याबरोबर शूट केला. "जया बच्चन सेटवर आल्यावर ते अधिक कम्फर्टेबल वाटत होते. ते अगदी मोकळेपणाने बोलत होते. त्यानंतर ते बोलताना खुलू लागले आणि मग त्यांच्या स्वभावाची रंजक बाजू समोर आली," असं सिमी ग्रेवाल म्हणाल्या.

थेट रेखाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा

मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल आणि रेखासोबत नाव जोडलं जातं यावरुन विचारण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी रेखाबरोबर अफेअर असल्याचं नाकारलं होतं. हे दावे फेटाळताना अमिताभ यांनी, "ती माझी सहकलाकार आणि कलिग आहे. जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळी सहाजिक आहे की आम्ही एकमेकांना भेटायचो. सामजिक स्तरावर आम्हा दोघांमध्ये काहीही नातं नाही. मी एवढच सांगू शकतो. कधीतरी आम्ही एखाद्या सोहळ्यामध्ये एकमेकांसमोर येतो. किंवा कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला एकत्र हजर असतो तेव्हाही एकमेकांसमोरुन क्वचितच जातो. बसं इतकच," असं अमिताभ यांनी सांगितलं होतं. 

सर्वाधिक चर्चेतील भाग

या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी दिलेल्या उत्तरांबरोबर सिमी ग्रेवाल यांनी अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने अमिताभ यांना विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांच्यामधील मानवी स्वभावाचे कांगोरे दर्शवणारा होता. हा या कार्यक्रमामधील सर्वाधिक चर्चेचा आणि अगदी आजही युट्यूबवर पाहिला जाणारा भाग आहे. 

एकत्र केलं काम

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांनी 1981 साली सिलसिला चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं.