मुंबई : #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग चर्चेत आणणारा सिनेमा 'धुरळा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्याचा राजकारणावर भाष्य करणारा हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. राजकारणात नेमकं कधी काय होईल याची कल्पना नसते. हेच वास्तव या सिनेमातून मांडल आहे.
समीर विद्वांस दिग्दर्शित सिनेमाचा अफलातून ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुलभूत गरजा पाणी, सुलभ शौचालय आणि शिक्षण यासाठी माणसाने झगडलं पाहिजे आणि ते मागून घेतलं पाहिजे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत.
अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. ट्रेलरनंतर सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. समीर विद्वांसचं दिग्दर्शन असून क्षितीज पटवर्धनने या सिनेमाचं लेखन केलं आहे. 3 जानेवारी 2020 रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
#पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन या सिनेमाची आहे. मराठीतील 9 कलाकार आणि 1 सिनेमा अशी या सिनेमाची खासियत आहे. 'धुरळा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला, ट्रेलररून हा सिनेमा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारित असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी या कलाकारांची फौज या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांचे कॅरॅक्टर पोस्टर्स प्रदर्शित झाले होते. त्यात अंकुश चौधरी 'दादा' च्या भूमिकेत तर सिद्धार्थ जाधव 'सिमेंट शेठ' ह्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सई ताम्हणकर, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकांची नावे अनुक्रमे हर्षदा, अक्का आणि मोनिका अशी असून, अमेय वाघच्या भूमिकेचं नाव हॅशटॅग भावज्या असं आहे. यामुळे सिनेमाची उत्सुकता ताणली गेली आहे.