काहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

Dharmendra : धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी ईशा, हेमा आणि अहाना यांची माफी मागितली आहे. अचानक काही नसताना धर्मेंद्र यांनी अशी पोस्ट शेअर का केली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2023, 01:34 PM IST
काहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली title=
(Photo Credit : Dharmendra Instagram)

Dharmendra : बॉलिवूडचे हीमॅन म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात. त्यांना आजही बॉलिवूडचे हॅन्डसम हंक बोलतात. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत सगळ्यात जास्त होती. धर्मेंद्र हे आता 87 वर्षांचे आहेत. धर्मेंद्र हे या वयातही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. तर सध्या त्यांचा नातू करण देओलच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. या सगळ्यात धर्मेंद्र यांनी त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि मुली ईशा आणि अहानासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी पश्चाताम होत असल्याचे म्हटले आहे. 

धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लेक ईशा देओलसोबत एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी इमोशन्ल पोस्ट शेअर केली आहे. यावेळी धर्मेंद्र म्हणाले, "ईशा, अहाना, हेमा आणि माझी सगळी मुलं... तख्तानी कुटुंब आणि वोहरा कुटुंबावर माझं खूप प्रेम आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आदर करतो... माझं वय आणि आजार मला सांगत आहेत की मी तुमच्यासाठी पर्सनली बोलू शकत होतो... पण..." असे कॅप्शन धर्मेंद्र यांनी दिले. धर्मेंद्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी धर्मेंद्रजी असं का म्हणाले याविषयी विचारताना दिसत आहेत. तर अनेकांनी तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे म्हटले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तख्तानी आणि वोहरा कुटुंबाशी काय आहे धर्मेंद्र यांचा संबंध?

तख्तानी कुटुंब म्हणजे भरत तख्तानीसोबत ईशा देओलचं लग्न झालं आहे. तर अहानाचं लग्न हे बिझनेस मॅन वैभव वोहराशी झालं आहे. 

Dharmendra shares Cryptic Post For Esha Deol Hema Malini says Could Have Spoken Personally To You But

ईशानं करणच्या लग्नाच्या एक-दोन दिवसानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत करण आणि द्रिशाला लग्नच्या शुभेच्छा दिल्या. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ईशा म्हणाली, "करण आणि द्रिशा तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आयुष्यभरासाठी एकमेकांचा साथ लाभो. खूप खूप प्रेम", असं यावेळी ईशा म्हणाली. 

हेही वाचा : Lust Stories 2 चे बोल्ड सीन पाहताना रुममध्ये कोणी आलं तर...; Tamannaah Bhatia चा सल्ला

दरम्यान, करणच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापैकी एक फोटो हा धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा होता. यावेळी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर हे एकत्र लग्नातील कार्यक्रमांचा आनंद घेताना दिसले तर त्याशिवाय त्यांनी करण आणि द्रिशाला आशीर्वाद देतानाचा आहे.धर्मेंद्र आणि प्रकाश कौर 1954 साली लग्न बंधनात अडकले होते.