मुंबई : चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि लता मंगेशकर यांचे घट्ट नाते होते. लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी सदैव प्रत्येकाच्या मनात राहतील. धर्मेंद्र आणि लता यांचे भावा-बहिणीचे नाते होते. गेली 3 ते 4 वर्षे दोघांमध्ये खूप चर्चा व्हायची. पण लतादीदींच्या जाण्यासोबत धर्मेंद्र यांची एक इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला. लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला होता.
"लताजी ज्या रुग्णालायत होत्या. तिथले डॉक्टर माझे मित्र आहे, मी लताजींसोबत बोलण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली, पण त्यांनी फोन उषाजींना दिला होता", असं धर्मेंद्र यांनी सांगितलं.
लता दींदींना ऑक्सिजन मास्क लावल्यामुळे त्यांना बोलता येणार नाही, असं उषा मंगेशकर धर्मेद्र यांना म्हणाल्या. शेवटच्या क्षणी दीदींशी संपर्क साधण्याची ही आठवण कायम स्मरणात राहिलं असं धमेंद्र म्हणाले.
अखेरचा निरोप देत ते लिहितात...
"दीदी, आठवणींमध्ये खरंच इतकी ताकद असती तर मी जीवाच्या आकांताने तुम्हाला हाक मारून बोलवून घेतलं असतं. जवळ बसवलं असतं, आपण दोघांनी खूप गप्पा मारल्या असत्या.. खूप आठवण येईल दीदी तुमची... खूप जास्त आठवण येईल... आठवणी खरंच इतक्या प्रभावी असतील तर मी तुम्हाला खरंच बोलवेन..."
दीदींशी शेवटचं बोलता आलं नसलं तरी जड अंत: करणाने धर्मेंद्र यांनी त्यांच्यासाठी लिहिलेले हे शब्द काळजाचा ठाव घेतात.