बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या वैवाहिक आयुष्यातील कटू सत्य उघड

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि परफेक्ट मानली जाते.

Updated: Feb 12, 2022, 06:34 PM IST
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या वैवाहिक आयुष्यातील कटू सत्य उघड title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरची जोडी बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि परफेक्ट मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, इतरांप्रमाणे या कपलचीही वैवाहिक जीवनात काही लोचा आहे. ज्याचा खुलासा 'द कपिल शर्मा शो'मध्ये झाला होता. ईथे या कपलमध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दलच मोठा गोंधळ निर्माण झाला, जो खूपच धक्कादायक होता.

करणसाठी वेलेंटाइन डे स्पेशल गेस्ट बनली बिपाशा
'द कपिल शर्मा शो'मध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर व्हॅलेंटाइन डेचे खास पाहुणे म्हणून दिसले. हा शो आज म्हणजेच शनिवारी १२ फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे. शोच्या आधीही त्याच्या काही क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या शोमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मजेशीर माहिती दिली. संवादादरम्यान अभिनेत्री अर्चना पूरण सिंहनं विचारलं की, त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात बिपाशा आणि करण म्हणाले, चार वर्षे किंवा सहा वर्षे. करण म्हणाला, 'माझ्याशी लग्न होऊन सहा वर्षे झाली आहेत.'

यानंतर बिपाशाने स्पष्ट केलं की, 'आम्ही ईथे तुम्हाला म्हणजेच (कपिल शर्मा) भेटायला आलो होतो आणि आम्हाला माहित होतं की, तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचाराण, आम्ही उत्तरं विसरून जाऊ, म्हणून आम्ही असं ठरवलं की चला आज बोलूच. म्हणून मी करणला विचारलं, 'अरे करण, आपल्या लग्नाला किती वर्षे झाली?' कारण मी मोजली आणि मला दोनच वर्षे आठवतायेत. यावर करणने उत्तर दिलं की, 'मी सांगतोय की, सहा वर्षे होतील. पण तिला ते मान्य नव्हतं. ती म्हणाली, 16, 17, 20, 21 चार वर्षे पूर्ण झाली? तर, मला सांग सहा वर्षे कशी झाली. पण तिच्यासाठी चार वर्षे. सर्व गोंधळानंतर अखेर त्यांनी या वर्षी 30 एप्रिल रोजी सहा वर्षे पूर्ण करणार असल्याचा सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर दोघांमध्ये होणाऱ्या भांडणबद्दल कपिल शर्माने विचारलं की, दोघांमध्ये काय भांडण आहे. तर करण म्हणाला की, चूक झाली तरच आमच्यात भांडण होतं. त्यानंतर कपिलने कोणती चूक विचारली, तर करण म्हणाला प्रत्येक वेळी मी नवीन चूक करतो. यानंतर सगळे जोरजोरात हसायला लागतात.