'धडक' च्या स्टारकास्टची फिस, जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

जान्हवीच नव्हे तर सिनेमातील हिरोला देखील खास रक्कम मिळाली नाही.

Updated: Jun 16, 2018, 10:14 PM IST
'धडक' च्या स्टारकास्टची फिस, जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन  title=

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालायं. मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. २० जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का पदार्पणाच्या सिनेमात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला १ कोटी मानधनही मिळाले नाही. मीडिया रिपोर्टनुसार तिला या सिनेमासाठी ४० ते ४५ लाख रुपये फिस दिली गेली.जान्हवीच नव्हे तर सिनेमातील हिरोला देखील खास रक्कम मिळाली नाही. एक नजर टाकूया इतर स्टारकास्टच्या मानधनावर...

ईशान खट्टर 

शाहिद कपूरचा भाऊ ईशान सिनेमात जान्हवीच्या हिरोची भूमिका साकारत आहे. त्याला या सिनेमासाठी ६० ते ७० लाख रुपये मिळाल्याची चर्चा आहे. याआधी त्याने माजिद माजीदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाउड' या सिनेमात काम केलंय. 

आशुतोष राणा 

 धडकमध्ये आशुतोष राणा हिरोईन जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. या रोलसाठी त्याला ५० लाख मिळाल्याचे सांगण्यात येते. 

शशांक खेतान

 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बनविलेल्या शशांकने जान्हवीचा डेब्यु सिनेमा दिग्दर्शित केलाय. यासाठी त्याला ४ कोटी मानधन देण्यात आलं. 

नागराज मंजुळे 

मराठी सिनेमा 'सैराट' ची कहाणी नागराज मंजुळेने लिहिली आहे. 'धडक' सिनेमा 'सैराट'चाच रिमेक आहे. नागराजला या कहाणीसाठी २ कोटी रुपये मानधन दिले गेल्याची चर्चा आहे. 

अजय-अतुल 

 या सिनेमालाही अजय-अतुल यांनी संगीत दिलंय. दोघांना या कामासाठी साधारण १.५ कोटी रुपये फिस मिळाल्याच सांगण्यात येत