डॉ. अजित सरु आजीचा काटा काढणार?

लवकरच होणार उलगडा 

Updated: Jan 15, 2021, 04:07 PM IST
डॉ. अजित सरु आजीचा काटा काढणार? title=

मुंबई : देवमाणूस' मालिकेत डॉ. अजितने मंजूच्या जमिनीबद्दल ज्या अफवा पसरवल्या त्याचा संजूला सुगावा लागल्याचं कळतं. अजित संजूचा खून करुन त्याला खड्ड्यात पुरायला जात असताना तिथे सरु आज्जी येते. सरु आज्जीचं येणं आणि निघून जाणं अजितला संशयास्पद वाटू लागतं. सरु आज्जीला खरंच दिसतं का..तिने काही पाहिलंय का हे त्याला कळत नाही.

सरु आज्जी सुद्धा वाड्यामागे काहीतरी पुरलंय याबद्दल बोलू लागते. मी पाहिलंय असं सांगते. पोलिसांना बोलवण्यापर्यंत प्रकरण जातं. अजितला सरु आज्जी आता डोईजड झालेय असं वाटू लागतं. तो सरु आज्जीचा काटा काढायचं ठरवतो. खरंच डॉ. अजित सरू आजीचा काटा काढणार? की सरू आजी डॉ. अजितचा खरा चेहेरा लोकांसमोर आणणार.

पाहायला विसरू नका 'देवमाणूस' रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर....