...म्हणून दीपिकाने शेअर केला 'छपाक' टीमसोबतचा फोटो

'छपाक'ची कथा एका सत्य घटनवेर आधारित आहे.

Updated: Jun 5, 2019, 07:41 PM IST
...म्हणून दीपिकाने शेअर केला 'छपाक' टीमसोबतचा फोटो title=

मुंबई : बॉलिवूड 'मस्तानी' दीपिका पदुकोणने तिचा आगामी चित्रपट 'छपाक'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. 'छपाक' अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची, त्याच्या शूटिंगची चर्चा सुरु होती. अखेर या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. 

'माझ्या करियरमधील सर्वात महत्वपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं...' असं म्हणत दीपिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट आणि क्रू मेंबर असून सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपटाची एक आठवण दीपिकाने शेअर केली आहे. दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहनेही चित्रपटाबाबत उत्साही असल्याचं म्हटलंय.

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसीदेखील भूमिका साकारणार आहे. 'छपाक'ची कथा एका सत्य घटनवेर आधारित आहे. दिल्ली आणि मुंबईत चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे.