'ही' चिमूकली आज बॉलिवूडवर करते राज्य; जाणून घ्या कोण आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'गुंडी' म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरा कोणीनसून...

Updated: Apr 11, 2021, 01:40 PM IST
'ही' चिमूकली आज बॉलिवूडवर करते राज्य; जाणून घ्या कोण आहे प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, जुन्या आठवणी  पुन्हा ताज्या करू शकतो. प्रसिद्ध कलाकार देखील कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. एवढचं  नाही तर चाहते देखील त्यांच्या आवडतीच्या कलाकारांच्या फोटोंवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करतात. 

आता बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने लहानपणाचा फोटो शेअर करत स्वतःला 'गुंडी' म्हटलं आहे. स्वतःला 'गुंडी' म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरा कोणीनसून तर ती अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय तिच्या या फोटोची चर्चा देखील जोरदार रंगत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका लहानपणाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'इंदिरानगर की गुंडी हूं मैं!' असं लिहिलं आहे. दीपिकाचा हा क्यूट फोटो  तिच्या आईने कॅमेऱ्यात कैद केला आहे. दीपिकाच्या आईचे नाव उज्वला आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिचा पती रणवीर सिंहने देखील प्रतिक्रिया तिली आहे. दीपिकाच्या फोटोवर बदामाचं रणवीरने  इमोजी पाठवला आहे. 

दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती '83' चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेता ऋतिक रोशनसोबत 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे.