पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....

पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 17, 2018, 05:29 PM IST
पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज.... title=

नवी दिल्ली : पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

काय आहे नवे...?

आता सपना दीदीच्या बायोपिकमध्ये दीपिका झळकणार आहे. या सिनेमाचे नाव रानी आहे. या सिनेमासाठी दीपिका जय्यद तयारी करत आहे. यात दीपिका एका डॉनची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे ती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका या सिनेमात सपना दीदी अक्का रहीमा खान यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. रहीमा खान ही ८० च्या दशकात मुंबईची माफिया क्वीन होती. त्यामुळे ही व्यक्तीरेखा दीपिकासाठी काहीशी आव्हानात्मक असणार आहे. यासाठी दीपिकाने आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. या सिनेमाचे शूटिंग मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे. पद्मावतमधील महाराणीनंतर दीपिकाला डॉनच्या भूमिकेत पाहाणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

इरफान दीपिकाची केमिस्ट्री

या सिनेमात दीपिकासोबत इरफान खानही प्रमुख भूमिकेत आहे. यात इरफान दीपिकाच्या पतीची आणि एका गॅंगस्टरची भूमिका साकारत आहे. यापूर्वी दीपिका आणि इरफान पीकू सिनेमात एकत्र दिसले होते. आता रानी या सिनेमातून दोघे एकत्र झळकतील. या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करत आहेत. हा सिनेमा यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल.