'Ranveer बेडवर...' Deepika Padukone च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

दीपिकाने वक्तव्य तर केलं, परंतु नंतर हे प्रकरण हाताळत म्हणाली की, बेडरुम...

Updated: Jan 29, 2022, 08:18 PM IST
'Ranveer बेडवर...' Deepika Padukone च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ title=

मुंबई : बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल म्हटल्या जाणार्‍या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नानंतरही सतत चर्चेत असतात. दोघांनी 2018 साली इटलीमध्ये लग्न केले. ही बातमी त्या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड बातम्यांपैकी एक होती. लग्नानंतर दोघेमध्ये आणखी चांगली केमिस्ट्रि पाहायला मिळाली. हे कपल अवॉर्ड शो असू दे किंवा कोणतीही मुलाखत. एकमेकांबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलताना दिसले. मग ते त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी असो किंवा त्याच्या पर्सनल गोष्टींशी संबंधीत एखादी गोष्ट असो. ते बिंधास्त कॅमेरासमोर एकमेकांबद्दल बोलतात.

एकदा दीपिकाने मीडियाशी बोलताना तिच्या जबाबदाऱ्यांसोबतच तिचे बेडरूमचे रहस्यही शेअर केले होते. खरेतर, हे जोडपे एका कार्यक्रमात पोहोचले. आता हे दाम्पत्य जिथं जाईल तिथं लोक त्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारतात आणि त्यांच्या नात्याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

लग्नानंतरही त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. त्यावेळी चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एकदा अभिनेत्रीने रणवीरबद्दल तिच्या बेडरूमचे सिक्रेट सगळ्यांसमोर शेअर केले. जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढेच काय तर दीपिकाचे उत्तर ऐकून खुद्द रणवीरलाही धक्का बसला आहे.

तिला रणवीरच्या स्टाईल आणि सौंदर्याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा दीपिका म्हणाली की, तो बराच वेळ शॉवर घेतो. याशिवाय ते टॉयलेटमध्येही बराच वेळ घालवतो. तिने पुढे सांगितले की, तो बेडवरतीही खूप वेळ लावतो. आता दीपिकाची ही गोष्ट ऐकून सगळेच थक्क झाले. ती काय बोलली हे पाहून तिचा नवराही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.

मग दीपिकाने हे प्रकरण हाताळले आणि म्हणाली की, बेडवरुन उठायला देखील खूप वेळ लावतो. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, त्याच्या दिवसाची सुरुवात पहिल्या चहाने होते. त्यामुळेच कदाचित त्याला बेडवरुन उठायला वेळ लागत असावा.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिकाचा गहराइयां नंतर फायटर आणि पठाणमध्ये देखील दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंगचा आगामी चित्रपट जयेशभाई देखील येणार आहे.