दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. दीपिका पूर्ण नऊ महिने अतिशय ऍक्टिव होती. रणवीरला मुलगा की मुलगी असा प्रश्न एका कार्यक्रमात केला होता. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. हे उत्तर आता पुन्हा एकदा लेकीच्या जन्मानंतर व्हायरल झालं आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरात आनंदाचा दिवस आला. दीपिकाने मुलीला जन्म दिला 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि '83' सारख्या सिनेमांमधून दीपिका-रणवीरची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला आहे. "स्वागत बेबी गर्ल! 8.9.2024," अशी खास पोस्ट शेअर केली आहे.
या दरम्यान रणवीरची एक जुनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात रणवीरला मुलगा हवा की मुलगी असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा रणवीरने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे.
या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर सिंह म्हणाला होता की, हा माझा पर्याय नाही. त्यांच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातही एक संवाद आहे, ‘मंदिरात जाताना विचारत नाही तुला लाडू हवा की शिरा’. त्याचप्रमाणे, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात हेच म्हणेन, देव माझ्यासाठी जे काही ठरवेल त्यात मी आनंदी राहीन.
रणवीर सिंहनेही सांगितले होते की, मला दीपिका पदुकोणसारखे मूल हवे आहे. येत्या दोन-तीन वर्षांत मला मुलं होऊ शकतात, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. तुमची वहिनी दीपिका लहान असताना खूप गोड होती. मी रोज तिचे बालपणीचे फोटो पाहतो आणि म्हणतो की, तू मला असे मूल दिलेस तर माझे आयुष्य चांगले होईल.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी 2018 साली लग्न केले. लग्नाच्या इतक्या वर्षांनी आज 8 सप्टेंबर 2024 रोजी या जोडप्याच्या घरी मुलीचा जन्म झाला. तेव्हापासून दीपिका-रणबीरबाबत बॉलिवूड वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांना मुलीचे पालक झाल्याबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटी सतत अभिनंदन करत आहेत. अभिनंदन करताना, करीना कपूरने लिहिले - सैफू आणि बेबोकडून आई आणि वडिलांचे अभिनंदन... देव लहान परीला आशीर्वाद देवो. श्रद्धा कपूर, अनन्या पांडे, प्रियांका चोप्रा आणि क्रिती सेनन यांनी लिहिले- मुलगी झाल्याच्या आनंदाबद्दल खूप खूप अभिनंदन. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने लिहिले- अभिनंदन... सर्वोत्कृष्ट क्लबमध्ये आपले स्वागत आहे. अर्जुन कपूरने लिहिले- लक्ष्मी आली, राणी आली. त्याचप्रमाणे परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, रुबिना दिलीक यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले.