बिग बॉस ११ : लग्नाबाबतच्या प्रश्नावर पाहा काय म्हणाली दीपिका...

बिग बॉस ११मध्ये आजच्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. ती आगामी पद्मावती या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येतेय. 

Updated: Nov 19, 2017, 07:48 PM IST
बिग बॉस ११ : लग्नाबाबतच्या प्रश्नावर पाहा काय म्हणाली दीपिका... title=

मुंबई : बिग बॉस ११मध्ये आजच्या एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. ती आगामी पद्मावती या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येतेय. 

त्याआधी बिग बॉसच्या ट्विटर अकाऊंवरुन या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यात सलमान खान आणि दीपिका पदुकोण एकमेकांशी बोलताना दिसतायत. 

या व्हिडीओत सलमान दीपिकाला एक प्रश्न विचारतोय. या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिका तिघांचे नाव घेते. रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि संजय लीला भन्साळी यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रश्नामध्ये दीपिकाला एकासोबत लग्न करायचेय, एकाला डेट करायचेय तर एकाला मारायचेय असे तीन प्रश्न विचारले जातात. 

यावर उत्तर देताना दीपिका म्हणजे, संजय भन्साळीशी लग्न करणार. त्यावर सलमान म्हणतो हे चालणार नाही. त्यानंतर दिपीका म्हणते रणवीर सिंगला डेट करणार आणि शाहीद कपूरला मारणार. हा व्हिडीओ बिग बॉसच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आलाय.