अभिनेत्रीची चाहत्यांना गुडन्यूज, घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा

प्रसिद्ध अभिनेत्री दूसऱ्यांदा बनणार आई, 4 महिन्यांपूर्वीच दिला होता मुलीला जन्म, कोण आहे ही अभिनेत्री?

Updated: Aug 16, 2022, 04:04 PM IST
अभिनेत्रीची चाहत्यांना गुडन्यूज, घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा title=

मुंबई :बॉलिवूड विश्वातून गेल्या महिन्याभरापासून अनेक अभिनेत्री प्रग्नेंट असल्याच्या बातम्या समोर येत आहे.नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि आलिया भट्ट यांच्या प्रेग्नेसीच्या चर्चा असताना आता ही प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार आहे. ही अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. गेल्या 4 महिन्यांपुर्वीच या अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा प्रेग्नेट झालेल्या या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री कोण आहे ते जाणून घेऊयात. 

बॉलिवूड विश्वासह अनेक प्रसिद्द टी्व्ही कपल्स आई-बाबा होतायत.त्यात टीव्ही कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी या कपलचं नाव देखील समोर येते. देबिना बॅनर्जी पुन्हा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे. 

फोटोत काय? 
देबिना बॅनर्जीने फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची 4 महिन्यांची मुलगी लियाना देखील गुरमीत आणि देबिनासोबत दिसत आहे. या परफेक्ट फॅमिली फोटोमध्ये या कपलने चौथ्या सदस्याच्या आगमनाची घोषणा केली आहे. देबिनाने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. गुरमीतने मुलगी लियानाला मांडीवर घेतले आहे. चित्रात गुरमीत बॅक पोजमध्ये आहे, देबिना गुरमीतकडे पाहत आहे. सोबतची सोनोग्राफी प्रतिमा दाखवत आहे. 

देबिना बॅनर्जी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहते की, नशीब काही निर्णय ठरवते. ते कोणीही बदलू शकत नाही. हा त्या आशीर्वादांपैकी एक आहे. लवकरच आम्हाला भेटायला येत आहे, अशा ओळी लिहून तिने दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची घोषणा केलीय. देबिनाच्या प्रेग्नेंसी पोस्टमुळे चाहत्यांना मोठी गुडन्यूज मिळाली आहे. तसेच अनेक कलाकार आणि चाहते त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे. टीव्ही कलाकार  युविका चौधरी, रश्मी देसाई, माही विज, टीना दत्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी या तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.  

एप्रिलमध्ये गोंडस मुलीला जन्म 
लग्नाच्या 11 वर्षानंतर देबिनाला आई होण्याचा आनंद मिळाला. 3 एप्रिल 2022 रोजी ती पहिल्यांदा आई झाली. त्यांना मुलगी झाली होती तिचे नाव त्यांनी लियाना ठेवले होते. आता पहिल्या अपत्याच्या 4 महिन्यांनंतरच देबिनाला दुसऱ्यांदा आई होण्याची संधी मिळाली आहे. या प्रग्नेसीच्या घोषणेनंतर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.