Bipasha Basu ने चाहत्यांना दिली 'गुडन्यूज', बेबी बंपचे फोटो पोस्ट करत म्हणाली..

शेवटी तो क्षण आलाच; बिपाशा बासूकडे लग्नाच्या 6 वर्षानंतर गोड बातमी, बेबी बंपचे फोटो पोस्ट करत म्हणाली..   

Updated: Aug 16, 2022, 01:14 PM IST
Bipasha Basu ने चाहत्यांना दिली 'गुडन्यूज', बेबी बंपचे फोटो पोस्ट करत म्हणाली..  title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू देखील आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. बिपाशा लवकरचं गोंडस बाळाला जन्म देणार आहे. बिपाशाने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशासोबत पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू आई-वडील होण्यासाठी तयार झाले आहेत. बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरचं पाळणा हलणार आहे. बिपाशाने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्री आणि करणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बेबी बंपसोबत फोटो शेअर करत अभिनेत्रीचे कॅप्शनमध्ये, 'आयुष्यातील नव्या टप्प्याला सुरुवात करत आहोत...' असं म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय अभिनेत्रीने शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. 

अशी झाली बिपाशा आणि करणच्या नात्याची सुरुवात 
एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2016 मध्ये करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांनी लग्न केलं. आत लग्नाच्या 6 वर्षांनंतर बिपाशा आणि करण आई-वडील होणार आहेत.