मुंबई : टीव्ही मालिका विश्वातील जोडी अभिनेता गुरमीत चौधरी आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनी प्रथमच आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचा फोटो टाकला नव्हता.मात्र आता त्या दोघांनीही आपल्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे.
अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिने ९ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यानंतर ३ एप्रिलला देबिनाने मुलगी लियानाला जन्म दिला होता. आता या जोडप्याने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना तिची एक झलक दाखवलीय.
देबिना आणि गुरमीतने मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहले की, 'लायनाची ओळख करून देत आहे...आमचे हृदय भरून आले आहे. ज्यांनी आमच्या मुलीसाठी प्रार्थना पाठवली आणि तिचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
जन्मानंतर ५ दिवसांनी मुलीला कावीळ
देबिनाने प्रसूतीनंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, तिच्या मुलीला जन्मानंतर पाच दिवसांनी कावीळ झाले. तिच्या काविळीची पातळी १९ होती, जी धोकादायक मानली जाते. यानंतर लियानाची रक्त तपासणी करण्यात आली आणि तिला इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले. अभिनेत्रीने पुढे सांगितले की जेव्हा लियानाला बिली लाइट रेजमध्ये ठेवण्यात आले होते, तेव्हा दुसऱ्याच दिवशी तिची कावीळ 10 झाली होती.