अखेर आमिर खान चढणार बोहल्यावर; होणाऱ्या बायकोचे फोटो पाहून व्हाल थक्क

आमिर खान देखील पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. 

Updated: Jul 3, 2022, 07:40 PM IST
अखेर आमिर खान चढणार बोहल्यावर; होणाऱ्या बायकोचे फोटो पाहून व्हाल थक्क title=

मुंबई : अलीकडेच आयएएस टीना दाबीचं दुसरं लग्न चर्चेत आलं होतं. आता बातम्या समोर येत आहेत की, टीनाचा एक्स पती अतहर आमिर खान देखील पुन्हा लग्नबंधनात अडकणार  आहे. यावेळी, श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या डॉ. महरीन यांच्यासोबत आयएएस अथर लग्नबंधनात अडकणार. या दोघांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करत दोघांनीही आपलं एंगेजमेंट झाली असल्याचं सांगितलं. चला तर मग जाणून घेऊया डॉ महरीनबद्दल काही गोष्टी.

कोण आहेत मेहरीन काझी? 
श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर मेहरीन या व्यवसायाने डॉक्टर आहेत. याशिवाय त्यांना काय आवडतं आणि त्यांनी कुठून अभ्यास पुर्ण केला आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

येथून पुर्ण केलं शिक्षण
मेहरीनच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिने मेडिसिनमध्ये एमडी केलं आहे. डॉ. मेहरीन काझी यांनी यूके आणि जर्मनी व्यतिरिक्त दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहरीन ही श्रीनगरमधील लाल बाजारची रहिवासी आहे. ती बऱ्याच दिवसांपासून अतहर आमिरला डेट करत होती.

फॅशनमध्ये स्वारस्य आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेहरीन सध्या राजधानी दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमध्ये काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असण्यासोबतच मेहरीन फॅशन इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहे.

तिला फॅशन आणि स्टाइलमध्ये खूप रस आहे. ज्याचा अंदाज तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्सवर आपल्याला पाहता येतो. मेहरीनचे इन्स्टावर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.डॉक्टर कॉसी महिलांशी संबंधित ब्रँड्सचा प्रचार करण्यासाठीही काम करतात.

आता अथरच्या आधीच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर. काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी असलेल्या अतहर आमिर खानने 2018 मध्ये आयएएस टीना दाबीसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.  2021 मध्ये हे दोघं वेगळे झाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीनाने 2015 मध्ये लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. तर अतहर दुसऱ्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर दोघंही मसुरी ट्रेनिंग दरम्यान भेटले आणि तिथे दोघांमध्ये प्रेम सुरू झालं.

घटस्फोटानंतर टीनाने नुकतंच आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केलं. प्रदीप हे पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. दोघंही सध्या राजस्थान केडरमध्ये कार्यरत आहेत.