मुंबई : अमरीश पुरी अभिनेता बनण्याच स्वप्न घेऊन मुंबईत आले होते. असंख्य स्क्रीन टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर त्यांनी LIC मध्ये नोकरी केली. यासोबतच ते पृथ्वी थिएटरमध्ये अॅक्टिंग करू लागले. थिएटर करता करता ते जाहीरातीतही दिसू लागले. एवढ स्ट्रगल त्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात केलं नाही. रुपेरी पडद्यापासून दूर राहून त्यांनी आपलं जग बनवलं आणि यशस्वीही झाले.
अमरीश पुरी यांची मुलगी नम्रताला बॉलिवूडपासून लांब राहायलाच आवडतं. ती खूप सुंदरआणि स्टाइलिश आहे. नम्रताने ग्रॅज्यूएशननंतर सॉफ्टवेयर इंजीनियरिंगमध्ये मास्टर केलं. नम्रता ही बॉलिवूड आणि लाईमलाईटपासून लांबच राहते. पण अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर अनेक जण तिला फॉलो देखील करतात. पण अभिनयाच्या क्षेत्रात तिला कोणताही रस नाही. या शिवाय तिला वेगळं काही तरी करण्याची इच्छा होती म्हणून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर तर झालीच सोबत कॉस्ट्यूम डिझायनरही बनलीयं.
अमरीश यांना राजीव पुरी नावाचा एक मुलगा आहे. तो बिझनेसमध्ये व्यस्त असतो.
अमरीश यांना ३९ व्या वर्षामध्ये सिनेमात काम मिळालं. 'रेशमा आणि शेरा' असं त्या सिनेमाचं नावं. या सिनेमात त्यांनी वहिदा रहेमान आणि सुनील दत्त यांच्यासोबत काम केलं. अमरिश हे बॉलीवुडचे असे व्हिलन होते जे सिनेमात हिरोवरही भारी पडायचे.
मिस्टर इंडीया, नगीना, नायक, दामिनी आणि कोयला यांसारख्या सिनेमातील त्यांचा अभिनय विसरता येणार नाही. ८० आणि ९० च्या दशकात अमरीश सिनेमातील महत्त्वाचा हिस्सा होते. त्यांनी कित्येक सिनेमात आठवणीत राहील अशी भूमिका केली. १२ जानेवारी २००५ मध्ये ब्रेन हॅमरेजने त्यांच निधन झालं.