डॅशिंग, वजनदार अन् कडक! खुर्ची सिनेमासाठी अक्षय वाघमारेने वाढवलं 'इतके' किलो वजन

 कलाकार म्हटलं की त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकदा हे कलाकार वजनावरून ट्रोल होताना पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक कलाकार फिट रहाण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतो.

सायली कौलगेकर | Updated: Nov 29, 2023, 02:41 PM IST
डॅशिंग, वजनदार अन् कडक! खुर्ची सिनेमासाठी अक्षय वाघमारेने वाढवलं 'इतके' किलो वजन title=

मुंबई : कलाकार म्हटलं की त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकदा हे कलाकार वजनावरून ट्रोल होताना पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक कलाकार फिट रहाण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतो. भूमिकेला साजेसं दिसण्यासाठी ही कलाकार मंडळी कसून मेहनत घेताना पाहायला मिळतात. ही घेतलेली मेहनत आपण मोठ्या पडद्यावर नेहमीच पाहतो.

अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने वजन वाढवलं असल्याचं समोर आलं आहे. वजन कमी करण्याबाबत अनेकदा आपण ऐकतो पण वजन वाढवण्याबाबत क्वचितचं ऐकायला मिळतं. मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारे याने त्याच्या आगामी 'खुर्ची' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी तब्बल ५ किलो वजन वाढवलं असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर रावडी अशा भूमिकेला साजेसं असं मसल गेन ही त्याने केलेलं पाहायला मिळतंय. अक्षयने घेतलेली ही मेहनत समोर आलेल्या फोटोंवरून पाहणं रंजक ठरतंय. पाच किलो वजन वाढवून व मसलवर विशेष काम करून अक्षयने पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे.

'खुर्ची' या चित्रपटात अक्षयची रावडी भूमिका असलेली पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स', व 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी  आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांचे असून  दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. अक्षयच्या या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयची मेहनत अर्थात वाखाणण्याजोगी आहे. 
याबाबत बोलताना अक्षय म्हणाला, "एखाद्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणं हे अर्थात आव्हानात्मक असतं. 

खुर्ची या माझ्या चित्रपटातील भूमिकेसाठी मी तब्बल ५ किलो वजन वाढवलं, आणि मसल गेन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. विशेष म्हणजे हे माझ्याकडून करून घेण्यात मला मदत केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. कारण माझी भूमिका तंतोतंत मांडण्यात सर्वांचा खारीचा वाटा आहे, असं मला वाटतं. तुम्ही आजवर खूप प्रेम माझ्यावर केलं आहात नक्कीच तुम्ही माझ्या खुर्ची सिनेमातील भूमिकेवरही तितकंच प्रेम कराल अशी आशा करतो" असं अक्षय म्हणाला. अक्षयची ही दमदार भूमिका येत्या १२ जानेवारी २०२४ ला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.