मुंबई : १५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला तारे जमीन पर हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडला होता. आजाराशी झुंज देत असलेल्या या मुलाच्या भावनिक प्रवासाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. या चित्रपटातील स्टारकास्टचं काम, कथा या सर्व गोष्टी लोकांच्या मनात घर करून गेल्या होत्या.
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इशान अवस्थी नावाच्या मुलाची भूमिका दर्शील सफारीने केली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर दर्शीलने अभिनयातून ब्रेक घेतला आणि अनेक वर्षांपासून तो पडद्यावर दिसला नाही. पण आता तो पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात परतणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दर्शील सफारीने त्याच्या पुनरागमनाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, तो बराच काळ कॅमेरापासून लांब होता. कारण त्याला यावेळी त्याच्या महाविद्यालयीन जीवनाचा अभ्यास करायचा होता आणि त्याचा आनंद घ्यायचा होता म्हणून त्याने ब्रेक घेतला कारण तो फक्त चौथीत असल्यापासून अभिनय करू लागला.
कॉलेजमध्ये तो नाटकांमध्ये भाग घेत राहिला आणि आता तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, यादरम्यान त्याने एक धक्कादायक बाबही सांगितली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो आमिर खानकडे कधीही काम मागणार नाही.
आमिर खानच्या सिनेमातून मिळाला होता ब्रेक
विशेष म्हणजे दर्शील सफारीला आमिर खानच्या चित्रपटातूनच ब्रेक मिळाला होता. मात्र आता दर्शील आमिरकडे काम मागणार नसल्याचं सांगितलं असून यामागील कारण म्हणजे त्याला काम मागायला लाज वाटतं. कारण काम मागून कमावता कामा नये. त्याने सांगितलं की, काम मागणं म्हणजे शॉर्टकट. आणि त्याला शॉर्टकट घ्यायचा नाही तर शिकायचं आहे. दर्शील आता बॉलीवूडमध्ये परतण्यास तयार आहे. मात्र तो आता कसा आणि कोणत्या प्रोजेक्टमधून पुनरागमन करत आहे याबद्दल त्याने काहीही सांगितलेलं नाही.