मुंबई : 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राचा यावर्षी मार्च महिन्या 'पगलैट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. यासिनेमात तिने विधवेची भूमिका साकारली आहे. सान्या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव असते. सानिया आपल्या खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत अशते. एका मुलाखती दरम्यान सान्याने सांगितलं की,'ती आता आपल्या लग्नाबद्दल काय विचार करते. तसेच इतर कलाकारांसोबत काम करण्याबाबत काय म्हणते.'
सान्याने आपल्या करिअरमध्ये खूपच उत्तम सिनेमांत काम केलंय. ज्या सिनेमात तिला उत्कृष्ठ कॅरेक्टर प्ले करायला मिळेलं. जसं की पटाखा, फोटोग्राफ आणि लूडो सारख्या सिनेमांचा समावेश देखील आहे. मुलाखती दरम्यान सान्याने सांगितलं की, ती अजून सिंगल आहे. आता ती लग्नासाठी तयार आहे.
हा खूप खासगी प्रश्न आहे. खरं सांगू तर मला नाही माहित... पण आता मी सिंगल आहे आणि लग्नासाठी तयार आहे. मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारत असते की, मी काय करायला हवं? त्यांनी मला सांगितलं की, 'मला स्वतःला वेगळं ठेवायला हवं. मला काहीच कळलं नाही. मला याबाबत काय करायचं आहे. मी काही नियम ठरवलेले नाहीत की, मला कसा जोडीदार हवा? कुणीही मिळाला तरी चालेल.'
पायलैटमध्ये साकारलेल्या भूमिकेबाबत कंगनाने तिचं कौतुक केलं होतं. यासोबत तिने लिहिलं होतं की, आपल्या अभिनयाबद्दल सिनिअरकडून अनेक प्रशंसा मिळण्यास तयार आहे. कंगनाने कौतुक केल्यामुळे सान्या आनंदी आहे. ती म्हणते, कंगना माझी सीनियर आहे आणि उत्तम कलाकार देखील. तिने माझं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तिच्याकडून कौतुक झाल्यामुळे मी आनंदी आहे. माझं कुटुंब देखील खूप आनंदी आहे.