Sapna Chaudhary Per show Fees: मनोरंजन उद्योगातील आणखी एक नाव म्हणजे सपना चौधरी (Sapna Chaudhary). गेल्या 14 वर्षात सपना कुठच्या कुठे पोहोचली आहे. आपल्या डान्सच्या जलवानं लाखोंना घायाळ करणारी ही नृत्यांगना आपल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी लाखो रूपये घेते. (dancer sapna chaudhary takes huge amount of money for a dance perfomance)
सपना चौधरीने वयाच्या 14 व्या वर्षी डान्स करायला सुरुवात केली तेव्हा ती नाईलाजाने या क्षेत्रात आली. वडिलांची सावली डोक्यावरून गेल्यानंतर तिच्यावर घर चालवण्याची मोठी जबाबदारी आली. त्यावेळी सपना अगदी छोट्या स्तरावर आयोजित कार्यक्रमात भाग घ्यायची पण बघता बघता सपना हरियाणात लोकप्रिय झाली आणि काही वर्षातच सपनाने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावले व ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वीही झाली. .
सपना चौधरीच्या डान्सचे आज वेड कोणाला नाही? तिच्या डान्स पाहण्यासाठी हजारो लोक जमतात पण तुम्हाला माहितीये का हरियाणात लोकप्रिय ठरलेली सपना चौधरी आपल्या एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते?
समोर आलेल्या माहितीनुसार सपना चौधरी एका स्टेज परफॉर्मन्ससाठी 20-25 लाख रुपये घेते. म्हणजेच सपनाच्या प्रत्येक डान्सचे आयोजन करणार्यांना ते खरोखरच महागात पडले आहे. पण तरीही सपनाचे दर महिन्याला अनेक शो बुक होतात.
आश्चर्य म्हणजे सपनाची ही क्रेझ लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही कायम आहे. सपनाची एकूण संपत्ती 5 कोटी आहे आणि तिच्या मेहनतीमुळे आणि कमाईमुळे सपना लक्झरीयस जीवन जगत आहे. दर आठवड्याला सपनाचे काही ना काही गाणे रिलीज केले जाते जे जबरदस्त हिट देखील होते.