Lockdown च्या दरम्यान अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म

आनंदवार्ता 

Updated: Apr 17, 2020, 09:22 AM IST
Lockdown च्या दरम्यान अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म  title=

मुंबई : संपूर्ण जगभरात जिथे कोरोना व्हायरसने थैमान मांडल आहे. यामुळे देशातील लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आलं आहे. या दरम्यान अभिनेत्री स्मृती खन्ना (Smriti Khanna) आणि गौतम गुप्ता (Gautam Gupta) यांना एक गोंडस मुलगी झाली आहे. या दोघांच हे पहिलं बाळ आहे. यामुळे ही खास भावना त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

इंस्टाग्रामवर फॉलोअर्ससोबत ही गोड बातमी त्यांनी शेअर केली आहे. स्मृतीने लिहिलं आहे की,'आमची राजकुमारी आली... १५.०४.२०२० यासोबत तिने बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांनी बाळाला आपल्या जवळ घेऊन हा फोटो काढला आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Our princess has arrived 15.04.2020

A post shared by Smriti Khanna (@smriti_khanna) on

फोटो शेअर केल्यानंतर अनेक जवळच्या मंडळींनी, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 'खूप आनंदी आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या परीला भेटण्यासाठी उत्सुक आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Are you still Pregnant? Me: Nope, I just shoplifted a watermelon #40weekspregnant #cantwaittomeetyou #pleasecomeout 

A post shared by Smriti Khanna (@smriti_khanna) on

स्मृती आणि गौतम यांनी २०१७ मध्ये लग्न केलं. या दोघांनी 'मेरी आशिकी तुम से ही' यामध्ये एकत्र काम केलं होतं. १५ एप्रिल रोजी स्मृतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्मृती खन्ना आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. जुहूमध्ये राहणाऱ्या स्मृतीने खारमधील हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला आहे. लॉकडाऊनमुळे त्या दोघांनीच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.